ETV Bharat / state

Heavy Rainfall in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर - Heavy Rainfall in Kolhapur

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 38 फुटावर पोहोचली असून मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Kolhapur Rain Update
कोल्हापूर पूरस्थिती
author img

By

Published : Jul 23, 2023, 5:07 PM IST

कोल्हापुरात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे बोलके वास्तव

कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील सुमारे 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणक्षेत्रासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. पूरबाधित गावांना आज सायंकाळपर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासह धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वैभववाडी-गगनबावडा– कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यात 24 राज्य मार्गापैकी आठ रस्ते बंद तर जिल्ह्यातील 122 रस्ते मार्गापैकी 17 रस्ते असे एकूण 25 रस्ते मार्ग बंद करण्यात आले आहेत. सध्या राधानगरी धरण 81.60 टक्के भरले आहे. दूधगंगा धरण 42.12 टक्के, वारणा धरण 69.29 टक्के, तुळशी धरण 41.77 टक्के भरले आहे.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना सूचना: कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यामधील आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावांना पुराचा सर्वांत जास्त फटका बसतो. या गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळपर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंबेवाडी, प्रयाग चिखली गावातील नागरिकांनी जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

'हे' मार्ग झाले बंद: कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 24 पैकी 5 राज्यमार्गावर पाणी आल्याने ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. तर 122 प्रमुख जिल्हा मार्गांपैकी 10 मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून एकंदरीत दोन्ही मिळून 15 मार्ग बंद करण्यात आले आहेत. निपाणी देवगड मार्गावरील मुरगुड शहराततील स्मशानभूमी जवळ पंचगंगा नदीचे पाणी आल्याने हा राज्य मार्गही बंद झाला आहे. मुरगुड-निढोरी मार्गावरील सध्या या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

NDRF ची 1 तुकडी कोल्हापुरात दाखल: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांसह NDRF ची 1 तुकडी कोल्हापुरात दाखल झाली आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 71 टक्के भरले आहे. धरणाच्या पॉवरहाऊसमधून 1 हजार 350 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात करण्यात येत आहे.

हेही वाचा:

  1. Nanded Rain Update: मुसळधार पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा, ६३ घरांची पडझड, एकाचा मृत्यू
  2. Mumbai Megablock News: अगोदरच पावसाने हाल बेहाल..भरीस भर म्हणजे आज रेल्वेचा मध्य, हार्बर मार्गावर 'मेघा'ब्लॉक
  3. Junagadh Rain : जुनागडमध्ये 3 तासात 10 इंच पाऊस, गुरे, वाहने गेली वाहून, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.