ETV Bharat / state

Panchganga Water level: कोल्हापुरात पावसाचा जोर; ७ बंधारे पाण्याखाली, राधानगरीतून 700 क्यूसेक पाण्याचा विसर्ग - Water level of Panchganga River

कोल्हापूर येथे हवामान खात्याने तीन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असताना, अंतिम टप्प्यात सर्वत्र दमदार पावसाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला असून, परिणामी पंचगंगा पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Panchgnaga water level
पंचगंगा नदीची पाणी पातळी कोल्हापूर
author img

By

Published : Jul 8, 2023, 10:49 PM IST

कोल्हापूर : जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर ग्रामीण भागात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला असून, परिणामी पंचगंगा पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर धरण क्षेत्रातही पाऊस जोरात सुरू असल्याने तळ गाठलेले राधानगरी धरण देखील 36.91 टक्के भरले आहे. तर दुपार पासून राधानगरी धणाच्या विद्युत विमोचनातून 700 क्युसेक्स पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सात बंधारे पाण्याखाली : जिल्ह्यातील धरण क्षेत्र असलेल्या राधानगरी, गगनबावडा, शाहुवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असला तरी, पावसाची बॅटिंग मात्र काय थांबलेली नाही. परिणामी कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फूट 7 इंचावर पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राजाराम बंधारा, शिंगणापूर बंधारा, रुई बंधारा, सुर्वे बंधारा, इचलकरंजी बंधारा, तेरवाड बंधारा, शिरोळ बंधारा यांचा समावेश आहे. दरम्यान हे सर्व बंधारे पाण्याखाली गेल्याने यावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग सुरु : सर्वाधिक पावसाची नोंद ही गगनबावडा तालुक्यात 417.5 मिमी करण्यात आली आहे. राधानगरी तालुक्यात 152.7 मिमी आणि आजरा तालुक्यात 163.8 मिमी तर शाहूवाडी तालुक्यात 149.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे धरण क्षेत्रात देखील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूर शहराची तहान भागवणारे राधानगरी धरण 36.61 टक्के भरले आहे. यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज दुपारपासून 800 क्युसेक्स पाणी राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचन मधून भोगावती नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

धोकादायक वाहतूक : पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा आज सकाळी यंदा प्रथमच पाण्याखाली गेला. त्यामुळे आसपासच्या वडणगे, निगवे, कसबा बावडा अशा दोन्ही टोकावरील गावांची वाहतूक ठप्प झाली. बंधाऱ्यावर पाणी आल्यानंतरही त्यावरून काहीजणांची धोकादायकरित्या वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

17 कोटींचा नवा पूल रखडला : राजाराम बंधाऱ्याला पर्यायी पूल बांधण्यासाठी राज्य शासनाकडून 17 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र भूसंपादन रखडल्यामुळे या पुलाचे काम ठप्प आहे. संततधार पावसामुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याने वडणगेसह 25 गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांना पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र नव्या पुलाचे काम बंद असल्याने हा पूल पूर्ण होणार का? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Weather Update Today: रेड अलर्ट असताना रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो, सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
  2. Maharashtra Weather Update: मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता; 'या' भागात ऑरेंज अलर्ट जारी
  3. Maharashtra Weather Update: रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना समाधानकारक पावसाची प्रतिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.