कोल्हापूर - पाणी कनेक्शन का तोडले जाब विचारण्यासाठी हातात तलवार घेऊन एकजण ग्रामपंचायत मध्ये शिरल्याची घटना ( water connection broken matter kolhapur ) समोर आली आहे. कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील तुरुंबे गावात ही धक्कादायक घटना घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. राजेंद्र भोईटे असे या व्यक्तीचे नाव आहे तर त्याची पत्नी धनश्री भोईटे ग्रामपंचायत सदस्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण ?
कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील राजेंद्र भोईटे यांचे पाणी कनेक्शन ग्रामपंचायतने तोडले. राजेंद्र भोईटे यांची पत्नी सद्या ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सदस्या आहेत. त्यामुळेच संतापलेले राजेंद्र भोईटे जाब विचारण्यासाठी थेट हातात तलवारच घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेले. त्यांच्या मागून त्यांची पत्नी तसेच अनेक लोकं त्यांना रोखण्यासाठी आले. मात्र संतापलेले भोईटे यांनी थेट ग्रामपंचायत दारात जाऊन उपसरपंच तसेच इतर ग्रामपंचायत सदस्यांना कनेक्शन का तोडले जाब विचारू लागले. ग्रामपंचायतमध्ये विविध विकासकामांबाबत मीटिंग सुरू होती. त्यामुळे ग्रामपंचायत दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे दरवाजावर लाथा मारून त्यांना तलवारीने ठार मारेन अशा पद्धतीची धमकी देऊ लागला. हा संपूर्ण प्रकार ग्रामपंचायत बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.
गावकऱ्यांनी मध्यस्थी करत हातातील तलवार काढून केले बाजूला -
दरम्यान, हातात तलवार घेऊन आलेल्या राजेंद्र भोईटे याला गावकऱ्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या सुद्धा अंगावर जाण्याचा प्रयत्न त्याने करत जवळ कोणी येऊ नका असे सांगत होता. मात्र या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकं ग्रामपंचायत परिसरात जमले. जमलेल्या जमावाने त्याच्या हातातील तलवार काढून घेत त्याला तिथून बाजूला केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून ग्रामपंचायत सदस्य संदीप भंडारी यांनी राधानगरी पोलिसांत त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.
हेही वाचा - Kolhapur Sugarcane Farm Fire : 30 एकरातील ऊसाला मोठी आग; पन्हाळा तालुक्यातील घटना