कोल्हापूर Hasan Mushrif News : राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांची कोल्हापुरात पहिल्यांदाच जाहीर सभा आहे. (Ajit Pawar Rally in Kolhapur) ही सभा कोणाच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नाही तर राज्यभरातील जनतेला विकास कामांची उत्तरदायित्व ठरेल अशी ही सभा आहे. या सभेला एका लाखाहून अधिक लोक जमतील असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलायं.
कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठी शक्ती प्रदर्शन जिल्ह्यात करण्यात येणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात अवघ्या दोन जागा मिळाल्या. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयानुसार जिल्ह्यात देतील त्या जागा लढू आणि जिंकून आणू याबरोबरच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणार असल्याचा विश्वास यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलायं.
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात इंडिया आघाडी निर्माण झालीयं. मात्र, अशा आघाड्यांचा कोणताही उपयोग होणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पराभव करू शकेल अशी कोणतीही शक्ती पैदा झालेली नाही-वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
ताराराणी चौकात होणार जंगी स्वागत : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच कोल्हापुरात येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या ताराराणी चौकात 25 फूट पुष्पहार घालून पवारांच्या स्वागताची तयारी करण्यात आलीयं. यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवर दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज, बिंदू चौकातील महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून दुचाकी रॅली तपोवन मैदान येथे होणाऱ्या जाहीर सभेकडे मार्गस्थ होणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवर राष्ट्रवादीच्या वतीने मोठ्या स्वागताची तयारी करण्यात आलीय.
हेही वाचा :