ETV Bharat / state

प्राप्तिकराच्या छाप्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना मुश्रीफांनी शांत राहण्याचे केले आवाहन

author img

By

Published : Jul 25, 2019, 10:23 PM IST

प्राप्तिकर विभागच्या छाप्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर जमा झाले होते. कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मुश्रीफ यांनी घराबाहेर येत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले.

आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यानंतर मुश्रीफ समर्थक मोठ्या प्रमाणावर घरासमोर जमले आहेत. सकाळपासूनच कागलमध्ये मुश्रीफ समर्थकांची गर्दी झाली. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. हसन मुश्रीफ आमचे देव आहेत गोरगरिबांची काम करतात, असे म्हणत महिलांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगी नंतर सायंकाळी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांत करत सर्वांना आपल्या घरी जाण्याचे आवाहन केले. तुमच्या बाहेर सुरू असलेल्या घोषणांमुळे आलेले अधिकारी घाबरले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत आणि आपण त्यांना संपूर्ण माहिती देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

कोणीही घाबरून जाऊ नये ते आपले काम करून उद्या निघून जातील, असेही मुश्रीफ यांनी आपल्या समर्थकांना सांगितले. सकाळपासून मुश्रीफ यांना अधिकाऱ्यांनी घराबाहेर जाण्याची परवानगी दिली नव्हती आणि कोणत्याही कार्यकर्त्याला घरामध्ये जाऊ सुद्धा दिले नव्हते. सायंकाळी मुश्रीफ यांना काही वेळ बाहेर जाण्याची परवानगी दिली यावेळी मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

Intro:अँकर- राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर मुश्रीफ समर्थक मोठ्या प्रमाणावर घरासमोर जमले आहेत. सकाळपासूनच कागलमध्ये मुश्रीफ समर्थकांची गर्दी झाली आहे. शिवाय अनेक महिलांनी मुश्रीफ यांच्या घरासमोर येऊन घोषणाबाजी सुद्धा केल्या. मुश्रीफ आमचे देव आहेत गोरगरिबांची काम करतात असे म्हणत भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा त्यांनी केली. त्यामुळे सायंकाळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगी नंतर आमदार हसन मुश्रीफ यांनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांत करत सर्वांना आपल्या घरी जाण्याचे आवाहन केले. तुमच्या बाहेर सुरू असलेल्या घोषणांमुळे आलेले अधिकारी घाबरले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे. ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत आणि आपण त्यांना संपूर्ण माहिती देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये ते आपले काम करून उद्या निघून जातील असेही मुश्रीफ यांनी आपल्या समर्थकांना सांगितले. सकाळपासूनच मुश्रीफ यांना अधिकाऱ्यांनी घराबाहेर जाण्याची परवानगी दिली नव्हती आणि कोणत्या कार्यकर्त्याला घरामध्ये जाऊ सुद्धा दिले नव्हते. पण सायंकाळी मुश्रीफ यांना काही वेळ बाहेर जाण्याची परवानगी दिली यावेळी मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.