कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवारांनी अर्ज भरले गेले आहेत. पण हातकणंगले मतदारसंघात राजु शेट्टी विरोधात राजू शेट्टी असणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेट्टींविरोधात बहुजन महा पार्टीच्या शेट्टी यांनी अर्ज भरल्याने कोल्हापुरात हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. महायुती आणि महाआघाडीत मुख्य लढत होणार असल्याचे दिसत असून त्यांच्या उमेदवारांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता छाननी, माघार या प्रक्रियेकडे लक्ष लागले असून २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ -
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात धनंजय भीमराव महाडीक(राष्ट्रवादी क्राँग्रेस), संजयसिंह सदाशीवराव मंडलीक(शिवसेना), किसन केरबा काटकर (बळीराजा पार्टी), महेश भगवान कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी), नागरत्न सिद्धार्थ अबासो (बहुजन मुक्ती पार्टी), दंडप्पा कुंडप्पा श्रीकांत (बहुजन समाज पार्टी), वैशाली संजयसिंह मंडलिक, अरविंद भिवा माने, मुल्ला मुस्ताक अजिज, राजेंद्र बाळासाहेब कोळी, सुधीर सुभाष महाडिक, अभिजित विकास जोशी (सर्व अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.
हातकणंगलेत लोकसभा मतदारसंघ -
हातकणंगले मतदार संघात आज शिवसेनेचे धैर्यशिल माने यांनी आणखी एक तसेच राजू मुजीकराव शेट्टी (बहुजन महा पार्टी), अजय प्रकाश कुरणे (बहुजन समाज पार्टी), आसलम सय्यद (वंचित बहुजन आघाडी), गजानन महादेव आंबी (हिंदुस्थान मानव पक्ष), मदन वजीर कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी) आणि डॉ. नितीन उदल भाट, संजय घनश्याम अग्रवाल, सुर्यकांत चिदानंद चिडचाळे, विश्वास आनंदा कांबळे, आनंदराव वसंतराव सरनाईक, ज्ञानू हरीबा पाटील, महादेव जगन्नाथ जगदाळे, संतोष केरबा खोत (सर्व अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केले.