ETV Bharat / state

किल्ले पन्हाळ्याच्या संरक्षणासाठी 'मास्टर प्लॅन' तयार करा, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना - पन्हाळा परिसरात ढगफुटी

पन्हाळा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. या पावसामुळे पन्हाळा परिसरातील सुमारे दीडशे एकरहून अधिक शेतीचे नुकसान झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

पन्हाळा
पन्हाळा
author img

By

Published : Sep 12, 2020, 10:12 PM IST

कोल्हापूर - पन्हाळा परिसरात ८ सप्टेंबरला ढगफुटी सदृश्य पावसाने पन्हाळा गडासह परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. याची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी महसूल विभाग, वन विभाग, पुरातत्व विभाग आणि पन्हाळा नगरपरिषदेने पन्हाळा गड संरक्षित राहण्यासाठी तीन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करून प्रस्ताव सादर करावा. सर्व कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येतील. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

८ सप्टेंबर रोजी पन्हाळा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. या पावसामुळे पन्हाळा परिसरातील सुमारे दीडशे एकरहून अधिक शेतीचे नुकसान झालंय, तर पन्हाळगडाच्या तटबंदीचेही नुकसान झाले. तीन दरवाजातील अंतर्गत रस्ता उखडला, तसेच तलावाची संरक्षक भिंत कोसळली तर हॉटेल ग्रीन पार्कमध्ये पाच फूट इतके पाणी शिरले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, गट विकास अधिकारी तुलसीदास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए.एस. माने, नगराध्यक्षा रुपाली धडेल, उपनगराध्यक्ष चेतन भोसले, पन्हाळा पंचायत समिती सभापती तेजस्वीनी शिंदे यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

हेही वाचा - राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

पाच मिनिटात १४० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याने पन्हाळा परिसरात प्रचंड नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने तटबंदीचे नुकसान तसेच तीन दरवाजा इथल्या रस्त्याचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीने गडाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी गड संरक्षित कसा राहावा यासाठी कायमचा मार्ग काढण्याची गरज असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गडावर साचलेले पाणी निचरा होण्यासाठी आयआयटीमधील आणि पुणे अभियांत्रिकी विद्यालयामधील तज्ञांकडून सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचीही गरज असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. पोल्ट्रीचे जे नुकसान झाले त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल.

महसूल विभाग, वन विभाग, पुरातत्त्व विभाग आणि पन्हाळा नगरपरिषदेने येथील कामांचा तीन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करून तो प्रस्ताव सादर करावा. यातील सर्व कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

हेही वाचा - केरळमध्ये नवीन प्रजातीच्या पालीचा शोध; साताऱ्यातील संशोधक डॉ.अमित सय्यद यांचे यश

पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे, या पन्हाळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय अशी आहे. त्यामुळे पन्हाळ्यातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. बुधवार पेठ ते पन्हाळ्यापर्यंत फ्लायओव्हर करण्याच्यादृष्टीने मास्टर प्लॅन तयार करावा अशी सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी संबंधित विभागाला दिली. तर पन्हाळ्यामध्ये येणारे अजून दोन रस्त्याचे प्रस्तावही नियोजित आहेत. हा ही प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी रणजित शिंदे, तय्यब मुजावर, नगरसेवक दिनकर भोपळे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.