कोल्हापूर - भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार गोपाळराव पाटील पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष सोडण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. गोपळाराव पाटील कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असून लवकरच कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. चंदगडमधील मोठा गट असलेल्या गोपाळराव पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून पक्ष प्रवेशावेळी दिलेला शब्द पाळला जात नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. पक्षाकडून सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी मोठी इनकमिंग झालेल्या भाजपला आता गळतीस सुरुवात झाली आहे. भाजमधील बडे नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकण्याची भाषा करत आहेत. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले चंदगडचे गोपाळराव पाटील हेसुद्धा भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. पक्षप्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द न पाळल्याचा गोपाळरावांनी आरोप केला आहे. ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची असल्याची वर्तविली जात आहे.
गोपाळराव पाटलांचे चंदगड येथे मोठे राजकीय प्रस्थ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना तिकीट देण्यात येईल असे, असे भाजपने आश्वसान दिल्याचा दावा गोपाळराव यांनी केला आहे. मात्र, ऐनवेळी भाजपने शिवाजी पाटील यांना तिकीट देऊन गोपाळराव यांना डावलण्यात आल्याचंही त्यांच्या समर्थकांकडून म्हटलं जात आहे. त्यामुळे पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोपही गोपाळराव समर्थकांकडून होत आहे. तसेच, भाजपमध्ये योग्य सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. या सर्व कारणांमुळे गोपाळराव पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा - जिल्हाधिकारी कार्यालयसह अनेक कार्यालयांनी थकवली कोट्यवधींची पाणीपट्टी
हेही वाचा - हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द चंद्रकांत पाटलांनी केला पूर्ण..!