ETV Bharat / state

गोकुळ निवडणूक : शेवटचा एक तास आणि वाढती धाकधूक - Gokul election

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक बुधवारी पार पडली. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आघाडीचा दणदणीत विजय मिळवला. सत्ताधारी गटाला मात्र 4 जागांवरच समाधान मानावे लागले. मोठ्या प्रमाणात झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे खरंतर सर्वांचीच धाकधूक वाढली होती. हीच धाकधूक मतमोजणीच्या शेवटच्या एका तासात सुद्धा स्पष्टपणे दिसून आली.

Gokul election; The last hour and a half
गोकुळ निवडणूक; शेवटचा एक तास आणि वाढती धाकधूक
author img

By

Published : May 6, 2021, 8:12 AM IST

कोल्हापूर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक बुधवारी पार पडली. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने दणदणीत विजय मिळवला. सत्ताधारी गटाला मात्र 4 जागांवरच समाधान मानावे लागले. मोठ्या प्रमाणात झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे खरंतर सर्वांचीच धाकधूक वाढली होती. हीच धाकधूक मतमोजणीच्या शेवटच्या एका तासात सुद्धा स्पष्टपणे दिसून आली. अंबरीश घाटगे आणि चेतन नरके यांनी तर स्वतः कॅल्क्युलेटर हातात घेत मिळालेल्या मतांची बेरीज करायला सुरुवात केली. शेवटी विरोधी आघाडीचा सर्वसाधारण गटात 3 जागांवर विजय झाला.

गोकुळ निवडणूक; शेवटचा एक तास आणि वाढती धाकधूक

सर्वसाधारण गटात शेवटच्या 4 फेरीत मिळालेल्या मतदान -

गोकुळच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटामध्ये एकूण 16 जागांसाठी सत्ताधारी, विरोधी गटासह एक अपक्ष असे 33 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये सत्ताधारी गटातील तीन उमेदवारांना मिळालेल्या चांगल्या मतांमुळे अधिकच चुरस निर्माण झाली होती.

  • 5 वी फेरी :
    बाळासाहेब खाडे - 1125 मते घेऊन 12 व्या स्थानी
    अंबरीश घाटगे - 1113 मते घेऊन 13 व्या स्थानी
    चेतन नरके - 1086 मते घेऊन 14 व्या स्थानी
  • 6 वी फेरी :
    अंबरीश घाटगे - 1318 मते घेऊन 11 व्या स्थानी
    चेतन नरके - 1284 मते घेऊन 13 व्या स्थानी
    बाळासाहेब खाडे - 1235 मते घेऊन 19 व्या स्थानावर गेले.

6 व्या फेरीमध्ये वीरेंद्र मंडलिक आणि चेतन नरके यांच्यामध्ये केवळ 26 मतांचा फरक होता. वीरेंद्र मंडलिक यांना 1256 इतकी मते पडली होती. त्यामुळे ते 17 व्या स्थानी होते. 6 व्या फेरीत मोठे बदल दिसून आले. त्यामुळे सातव्या फेरीच्या आकडेवारीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

  • 7 वी फेरी :
    बाळासाहेब खाडे - 1556 मते घेऊन 12 व्या स्थानी
    अंबरीश घाटगे - 1552 मते घेऊन 13 व्या स्थानी
    चेतन नरके - 1526 मते घेऊन 14 व्या स्थानी

7 व्या फेरीअंती बाळासाहेब खाडे पुन्हा 19 व्या स्थानावरून 12 स्थानावर आले.

  • 8 वी फेरी :
    बाळासाहेब खाडे - 1763 मते घेऊन 12 व्या स्थानी
    अंबरीश घाटगे - 1754 मते घेऊन 13 व्या स्थानी
    चेतन नरके - 1724 मते घेऊन 14 व्या स्थानी

यामध्ये 50 ते 100 मतांच्या फरकाने सत्ताधारी आघाडीच्या या तिघांचाही विजय झाला. मात्र कमालीची धाकधूक तसेच तिघांनाही विजयाचा असलेल्या आत्मविश्वास सुद्धा यावेळी पाहायला मिळाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.