ETV Bharat / state

जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन - Girish Jadhav

जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे आज मंगळवार (दि. ३)रोजी येथील जयसिंगपूरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. जाधव यांनी सुमारे ५० वर्ष महाराष्ट्रात फिरून शस्त्रांचा मोठा साठा निर्माण केला होता. यामध्ये शस्त्रास्त्रे आणि प्रात्यक्षिके हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्याकडे प्रामुख्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांचा मोठा संग्रह होता.

जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन

author img

By

Published : Nov 3, 2021, 3:03 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूरमधील जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे आज मंगळवार (दि. ३)रोजी येथील जयसिंगपूरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. जाधव यांनी सुमारे ५० वर्ष महाराष्ट्रात फिरून शस्त्रांचा मोठा साठा निर्माण केला होता. यामध्ये शस्त्रास्त्रे आणि प्रात्यक्षिके हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्याकडे प्रामुख्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांचा मोठा संग्रह होता. याबरोबरच गडकोट-किल्ल्यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत.

जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन
जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन

महाविद्यालयीन दशेपासूनच संग्रहाची गोडी

गिरीश जाधव हे मुळचे कोल्हापुर येथील हातकणंगले तालुक्यातल्या जयसिंगपूरचे रहिवासी होते. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक जयसिंगपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण जाधव हे त्यांचे वडील. सुरुवातीला मुंबईत बीई केमिकल इंजिनिअरिंग आणि नंतर मार्केटिंग क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या गिरीश जाधव यांना इतिहास प्रेमातून दुर्मिळ शस्त्रास्त्रांच्या संग्रहाचा छंद जडला. गिरीश जाधव यांना गडकिल्ले, शस्त्रास्त्रे आदींचे मोठे कुतूहल आणि त्याचा संग्रह करण्याबाबत प्रचंड इच्छा होती. पुढे जाऊन त्यांना याचा प्रचंड छंद जडला. कॉलेजवयात असल्यापासूनच त्यांना संग्रह करण्याची आवड लागली होती. स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडूनही त्यांना याबाबत मोठे मार्गदर्शन लाभले होते. नंतर त्यांनी जयसिंगपूर येथून मुंबईमध्ये वास्तव्यास गेले. त्याठिकाणीही त्यांच्या संग्रहात प्रचंड झाली.

शिवकालीन शस्त्र
शिवकालीन शस्त्र
शिवकालीन शस्त्र
शिवकालीन शस्त्र

त्यांनी प्रदर्शन मांडण्यास सुरुवात केली

आजवर ते राज्यासह देशातील महत्वाच्या ठिकाणी भेट देऊन ते शस्त्रास्त्रांचा शोध घेत राहिले. अनेकांनी तर त्यांना विविध दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रे सुद्धा भेट दिले. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी इतिहास कालीन शस्त्रास्त्र संग्रह आणि त्यांचा अभ्यास करून संशोधनाचे व्रत जोपासले होते. यामध्ये शिवकालीन तलवारी, भाले, तोफगोळे, जुने बाण, बिचवा, वाघनाखे, चिलखत, सुरा, खंजीर, कट्यारी आदी शस्त्रास्त्रांचा त्यांच्याकडे मोठा संग्रह होता. या शस्त्रास्त्रांचा संग्रह आणि अभ्यास स्वतः पुरता मर्यादित न ठेवता तो जनसामान्यांपर्यंत पोहोचावा तसेच येणाऱ्या पिढीने यातून आदर्श घ्यावा यासाठी त्यांनी प्रदर्शन मांडण्यास सुरुवात केली. त्यामुळेच अनेकांपर्यंत या दुर्मिळ आणि मौल्यवान शस्त्रास्त्रांची माहिती पोहोचली आहे.

शिवकालीन शस्त्र
शिवकालीन शस्त्र

हेही वाचा - विठ्ठल-रुक्मिणी मातेला लवकरच नवे अलंकार, मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.