ETV Bharat / state

गुढीपाडव्याच्या मुर्हुतावर कोल्हापुरात गूळसौदे; क्विंटलला ५१०० भाव - बाजार समिती

शाहू मार्केट यार्डात गूळ बाजारात झालेल्या मुहुर्ताच्या सौद्यात गुळाला ३५०० ते ५१०० असा प्रती क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती बाबासो लाड यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले.

गूळ
author img

By

Published : Apr 6, 2019, 2:52 PM IST

कोल्हापूर - गुढीपाडव्याला कोल्हापुरात गूळ उत्पादकांना चांगलाच सुगीचा हंगाम असतो. शाहू मार्केट यार्डात गूळ बाजारात झालेल्या मुहुर्ताच्या सौद्यात गुळाला ३५०० ते ५१०० असा प्रती क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती बाबासो लाड यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले. हे सौदे गुरुदत्त ट्रेडर्स यांच्या अडत दुकानात झाले.

गूळसौदा

यंदाच्या गूळ हंगामात जवळपास २५ लाख गूळ रव्यांचे सौदे झाले आहेत. नव्याने गूळ या बाजारपेठेत येत आहेत. अशात लहान गुळाला सर्वाधिक मागणी असल्याने एक किलो - दोन किलोचे गूळ रवे बाजारात येत आहेत. तसेच परंपरागत दहा किलो ते तीस किलोपर्यंतचे गूळ रवे बाजारात येतात. या गुळाला गुजरातमधून सर्वाधिक मागणी आहे. गेल्या काही वर्षात अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुऱ्हाळ घरे बंद होत आहेत. यात गेल्या दहा वर्षात गुळाचे भावही कमी आले. त्यामुळे अनेक गुऱ्हाळ घरे बंद झाली. मात्र गेल्या दोन वर्षापासून गुळाला चांगला भाव मिळत असल्याने गुळाची आवक वाढतानाही पाहायला मिळत आहे.

गुढीपाडव्याच्या परंपरेनुसार बाजार समितीमध्ये आज पाडवा मुर्हुतावर गूळ सौदे झाले. यात ३ हजार ५०० ते ५ हजार १०० असा भाव मिळाला. हा भाव हंगामाच्या अखेरपर्यंत टिकून रहाण्यासाठी चांगल्या प्रतीचा गूळ बाजारात येणे महत्वाचे आहे. आजच्या सौद्याला गुळाला चांगला भाव मिळाल्याच्या प्रतिक्रिया गूळ उत्पादकांनी व्यक्त केल्या आहेत.

Intro:अँकर- गुढी पाडव्याच्या मुर्हुतावर शाहू मार्केट यार्डात गुळ बाजारात झालेल्या मुहुर्ताच्या सौद्यात ३५०० ते ५१०० असा प्रती क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती बाबासो लाड यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले हे सौदे गुरुदत्त ट्रेडर्स यांच्या अडत दुकानात झाले. Body:व्हीओ : यंदाच्या गुळ हंगामात जवळपास २५ लाख गुळ रव्यांचे सौदे झाले आहेत. नव्याने गुळ या बाजारपेठेत येत आहेत. अशात लहान गुळाला सर्वाधिक मागणी असल्याने एक किलो - दोन किलोचे गुळ रवे बाजारात येत आहेत. तसेच परंपरागत दहा किलो ते तीस किलोपर्यंतचे गुळ रवे बाजारात येतात. या गुळाला गुजरातमधून सर्वाधिक मागणी आहे. गेल्या कांही वर्षात अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुऱ्हाळ घरे बंद होत आहेत. यात गेल्या दहा वर्षात गुळाचे भावही कमी आले. त्यामुळे अनेक गुऱ्हाळ घरे बंद झाली. मात्र गेल्या दोन वर्षापासून गुळाला चांगला भाव मिळत असल्याने गुळाच्या आवकेत वाढ होतानाही पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या परंपरंनुसार बाजार समितीमध्ये आज पाडवा मुर्हुतावर गुळ सौदे झाले. यात ३ हजार ५०० ते ५ हजार १०० असा भाव मिळाला हा भाव हंगामाच्या अखेरपर्यंत टिकून रहाण्यासाठी चांगल्या प्रतीचा गुळ बाजारात येणे महत्वाचे आहे. आज च्या सौदयाला गुळाला चांगला भाव मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया गुळ उत्पादकांनी व्यक्त केल्या आहेत.

बाईट १ : अडत व्यापारी
बाईट २ : गूळ उत्पादकConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.