कोल्हापूर - यंदा पारंपरिक आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे. गणेशोत्सवात होणारा अतिरिक्त खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
यासंदर्भात येथील मंगळवारपेठेत अनेक मंडळे एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यावर एवढी मोठी आपत्ती आली असताना मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करणे योग्य नसून पुरग्रस्तांच्या संकटात आम्हीही त्यांना साथ देणार असल्याचे सर्वांनी म्हटले आहे. काही मंडळांनी तर डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याचेही जाहीर केले आहे.