ETV Bharat / state

Rajesh Kshirsagar : संजय राऊत तुम्हीच शिवसेना संपवली - माजी आमदार राजेश क्षीरसागर - राजेश क्षीरसागर

माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सीमावादावरून टीका ( Rajesh Kshirsagar critics on Sanjay Raut ) केली आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांनी शिवसेना संपवली असल्याचा आरोप केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 3, 2022, 10:37 PM IST

कोल्हापूर: संजय राऊत कोणाच्या जीवावर निवडून आले याचे उत्तर त्यांनी द्यावे. ज्यांच्यावर सध्या तुम्ही टीका करत आहात त्यांच्या जीवावरच तुम्ही निवडून आलेला आहात. आम्ही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन तृतीयांश बहुमत सिद्ध करत वेगळा गट निर्माण केला आहे. आमदार खासदारांविरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे म्हणत क्षीरसागर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही राज्यसभेची राजीनामा द्या आणि जनतेमधून निवडणूक लढवून दाखवावी तुम्ही नेहमीच मागच्या दाराने राज्यसभेवर जाता व संजय राऊत शिवसेना तुम्हीच संपवली, अशी घणघाती टीका माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी संजय राऊत यांच्यावर केली (Rajesh Kshirsagar critics on Sanjay Raut ) आहे.

चोराच्या उलट्या बोंबा - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावे देश सर्वांचा आहे आणि कोणालाही कुठे जायचं हे गोमय्या सांगू शकत नाहीत. त्यांचे हे वक्तव्य अशोभनीय आहे. सध्या न्यायालयात याबाबतची केस सुरू असताना चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्याप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा चिघळत चालला असून याकरिता महाराष्ट्रचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई हे कर्नाटकला जाणार आहेत. मात्र कोणत्याही महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी इशारा दिला आहे. यावर माजी आमदार राजेश क्षीरसागर हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

वकिलांचे पगारही दिले नव्हते - आमच्या अगोदर अडीच वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही सीमा प्रश्र्नी काय केले? आमचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली. मात्र तुम्ही तर वकिलांचे पगार देखील दिले नव्हते, तेही आम्हीच दिले उगाच काहीही विधान करून नागरिकांमध्ये वेगळा वातावरण निर्माण करण्याची भूमिका संजय राऊत यांनी थांबवावी, असे माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत. कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जत तसेच अक्कलकोटवर आपला दावा सांगत येथील गावांसाठी पाणी देखील सोडले. यामुळे संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.