कोल्हापूर : जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरची नेहमीच विविध विषयांमुळे चर्चा असते. याच कोल्हापूरात फुटबॉलप्रेम ( Kolhapur Football Lover ) सुद्धा वारंवार दिसून येते. इथल्या पेठेपेठांमधल्या मुलांच्या रक्तातच फुटबॉल आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इथल्या अनेक गल्ल्यांमध्ये फुटबॉलचे प्रेम दिसून येते. इथल्या लोकांना फुटबॉल खेळाबद्दल असलेले प्रेम आजच्या फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना फायनल मॅचच्या ( FIFA World Cup final match ) पार्श्वभूमीवर दिसून आले. कोल्हापूर शहरातल्या अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्क्रीन ( FIFA World Cup final match on screen In Kolhapur ) लावून तालीम मंडळे मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत.
कोल्हापूरात अंतिम सामना स्क्रिनवर : कतार येथे फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील पेठांमध्ये फुटबॉल फिवर पाहायला मिळाला. एखाद्या सणाप्रमाणे इथल्या मुलांनी गल्ल्या सजवल्या होत्या. अनेक पताका पोस्टर्स आणि आपापल्या आवडत्या संघाला सपोर्ट करणारे फलक लागले होते. शिवाय शहरातला क्वचितच एखादा रोड आहे, जिथे फुटबॉल संदर्भातील होर्डिंग लागले नाही. फीफा विश्वचषकात फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना अंतिम सामना ( FIFA World Cup final match ) सुरू असताना शहरात अनेक ठिकाणी स्क्रीन ( final match on screen In Kolhapur ) लागल्याचे पाहायला मिळाले. शहरातच काय तर अनेक गावात सुद्धा हेच चित्र पाहायला मिळाले.
ग्राउंडवर स्क्रीन : अनेक पेठेपेठांमध्ये जरी स्क्रीन असल्या तरी कोल्हापूरातील अनेक मैदाने तसेच टर्फ ग्राउंडवर स्क्रीन लावण्यात आले आहेत. कसबा बावडा येथील पॅव्हेलीयन मैदान तसेच गांधी मैदान आदी ठिकाणी स्क्रीन लावण्यात आल्या असून फायनल फुटबॉल मॅचचा आनंद कोल्हापूरकर घेत आहेत.
कोल्हापूरात अनेक फुटबॉल खेळाडू : दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याला केवळ फुटबॉल खेळाचे वेड नाही इथे विविध खेळांचे अनेक खेळाडू घडले सुद्धा आहेत. राजर्षी शाहू महाराज तसेच राजाराम महाराज यांच्यापासून कोल्हापूरात या खेळाला प्रचंड प्रेम मिळाले आहे. एकीकडे भारतात क्रिकेटला जेव्हढे प्रेम मिळते अगदी तेव्हढेच किंबहुना त्यापेक्षाही जादा प्रेम इथे फुटबॉल खेळाला मिळते. भारतीय फुटबॉल संघात कोल्हापूरातील अनिकेत जाधव नावाचा खेळाडू सुद्धा आहे. त्यामुळे केवळ खेळावर प्रेम नसून इथे अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर झळकले आहेत. हेच प्रेम दरवेळी होत असलेल्या वर्ल्डकप फुटबॉल मॅच वेळी दिसून येते.