कोल्हापूर - गार्डन क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेने विविध जातीच्या देशी विदेशी रंगी बेरंगी फुलांचे प्रदर्शन महावीर गार्डन येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनात हजारो जातींची फुलं, फुलझाडं आणि फुलांपासून केलेली सजावट पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे.
हेही वाचा - कोल्हापूरकरांचे अनोखे आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्यांचा साजरा केला वाढदिवस
या पुष्प प्रदर्शनात विविध फुले आणि झाडांसोबतच आपली बाग कशा पद्धतीने सजवायची याची माहिती देखील दिली जात आहे. याठिकाणी प्रदर्शनासोबत फुलांच्या सजावटीची स्पर्धा देखील भरवण्यात आली आहे. या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेऊन आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे. हे प्रदर्शन ३ दिवसांसाठी आयोजित केले असून हे पाहण्यासाठी कोल्हापूरसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
हेही वाचा - एकदम कडक..! पन्हाळा गडावरील 'झुणका भाकर' पुन्हा तेजीत
या प्रदर्शनात विविध रंगी फुलांच्या उत्तमोत्तम कलाकृती या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे. गेले ४९ वर्षे हे प्रदर्शन दरवर्षी कोल्हापुरात आयोजित केले आहे. कोल्हापूरकरांचा याला उदंड प्रतिसाद मिळत आहे.