कोल्हापूर - महाप्रलयाचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिखली व आंबेवाडी गावातील नागरिकांनी गणेश मूर्ती दान करण्याचा यावर्षी निर्णय घेत हजारो मूर्ती दान केल्या. मूर्ती नदीत विसर्जित केल्याने प्रदूषण होत असल्याने हे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे.
महापुराने चिखलीतील अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त केले. त्यामुळे गावातील लोकांनी सुद्धा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. नदीनेही आता सर्वांना एक इशारा दिला होता. त्यामुळे पुन्हा कधीच नदीमध्ये गणेश विसर्जन करून पाण्याचे प्रदूषण न करण्याचा निर्धारच यावेळी गावकऱ्यांनी केला.