कोल्हापूर - गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कोल्हापूरमधील मटण विक्री बंद होती. ती आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शांत असलेल्या मटण मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा रेलचेल पाहायला मिळत आहे. मटण विक्री संबंधी कृती समिती आणि मटण विक्रेत्यांच्यात अनेक बैठका झाल्यानंतर आज (मंगळवारी) त्यावर तोडगा निघाला. सध्या तरी कोल्हापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - कोल्हापुरातील मटण विक्रेत्यांचा बेमुदत बंदचा इशारा!
बऱ्याच दिवसांपासून मटण दरासंबंधी तोडगा निघत नव्हता. याला पर्याय म्हणून काही लोकांनी मटण खरेदीसाठी ग्रामीण भागामध्ये धाव घेतली होती. मात्र, आज ठरलेल्या निर्णयामुळे कोल्हापूरकरांना आता ग्रामीण भागात जाण्याची गरज नाही. लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, आता मटण मार्केटमध्ये पुन्हा एकदा गर्दी पाहायला मिळत आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आढावा घेतला आहे.