कोल्हापूर - गेल्या एक महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये अनेक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपले योगदान देत आहेत. अशाच सर्वांचा गिरगावमधील नागरिकांनी आगळ्या वेगळ्या प्रकारे पुष्पवृष्टी करत सत्कार केला. यामध्ये आरोग्य सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा समावेश आहे.
हे सर्वजण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र जनजागृती करत आहेत. देशभर सध्या कोरोनाचे रुग्न वाढत असताना जिल्ह्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. परिस्थिती नियंत्रणात राहण्यामागे या सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले योगदान देत आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा टाळ्या वाजवून आणि पुष्पवृष्टी करत सत्कार करण्यात आला. क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्था आणि अनंतशांती संस्था यांनी मिळून हा सत्कार केला.
हेही वाचा - मुंबई-पुणे भागातील लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप सुद्धा करण्यात आले. यावेळी फिरंगोजी शिंदे संस्थेचे प्रमोद पाटील, सुभाष पाटील, अनंत शांतीचे अध्यक्ष भगवान गुरव, सरपंच संध्या पाटील, उपसरपंच पांडुरंग खेडकर, सदस्य सुरेश पाटील, ग्रामसेवक पुनम कांबळे, परिचारिका आफळे, इस्पूर्ली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सतिश पाटील यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.