ETV Bharat / state

Son of Dinkarrao Jadhav : माजी आमदाराच्या मुलाकडून मतदारांना जीवे मारण्याची धमकी; कायदेशीर कारवाई करण्याची मागणी - मतदारांना जीवे मारण्याची धमकी

ग्रामपंचायत निवडणुकीकरीता अनेक गावांत सध्या प्रचाराचा धुरळा सुरू (campaign begins ) आहे. प्रचार सुरू असताना एका सभेत माजी आमदाराच्या मुलाने मतदारांना आणि विरोधी उमेदवारांना जीवे मारण्याची धमकी दिली ( Death threats to opposition candidates ) आहे. त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी आता करण्यात आली आहे.

Son of Dinkarrao Jadhav
जीवे मारण्याची धमकी
author img

By

Published : Dec 16, 2022, 2:08 PM IST

मतदारांना जीवे मारण्याची धमकी

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ( Battle of Gram Panchayat Elections ) सुरू असल्याने अनेक गावांत सद्या प्रचाराचा धुरळा सुरू (campaign begins ) आहे. याच ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू असताना एका सभेत माजी आमदाराच्या पुत्राने मतदारांना आणि विरोधी उमेदवारांना जीवे मारण्याची धमकी दिली ( Death threats to opposition candidates ) आहे. भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारामध्ये विना परवाना सुरू असलेल्या प्रचार सभेत मतदारांना व विरोधी उमेदवारांना माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव विश्वजित जाधव ( Former MLA Dinkarrao Jadhav ) यांनी जिवे मारण्याची धमकी ( Death threats ) दिल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी आता करण्यात आली आहे.

भर सभेत मतदारांना दम : सन 2022 ते 2027 पंचवार्षिक निवडणूकी करीता तिरवडे-कुडतरवाडी गुप ग्रामपंचायतचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या ग्रामपंचायत तिरवडे गावातील लोकनियुक्त सरपंच पदासाठी माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा शुभांगी विश्वजीत जाधव निवडणुक लढवत आहेत. याच ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 13 डिसेंबर रोजी रात्री कोणतीही कायदेशीर प्रशासकीय परवानगी न घेता बेकायदेशीररित्या शुभांगी जाधव यांचे सांगणेवरुन विश्वजीत जाधव यांनी तिरवडे येथील लोकांचा जमाव करुन कुदरवाडी या ठिकाणी रात्री सभा घेतली. यावेळी मतदारांना व विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना मागच्या वेळी वाचलास काय वाट्टेल ते झाले तरी आम्हाला येथे शुभांगीची शिट निवडून येणे गरजेचे आहे. जर शुभांगीच काय झाल तर इथे वाईट परिणाम होणार एवढच सांगतो असे म्हणून सामाजिक शांतता भंग करण्याचे व कायदेशीर सुव्यवस्था बिघडवणेचे उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य केलेले आहे. तसेच मतदारांना धमकावून भिती दाखवून आचारसंहीता भंग केलेली आहे. याबाबत रीतसर तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

कायदेशीर कारवाई करावी : बाबा नांदेकर अशा वक्तव्यामुळे मतदारांच्या मनामध्ये भितीची व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून निवडणूकीच्या कालावधीमध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधीनी मतदारांना जाहीर पध्दतीने धमकावले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांचेकडे तक्रार देत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.