कोल्हापूर - दारूच्या नशेत वाद झाल्याने मित्रानेच गावठी दारूच्या अड्ड्यावर दगडाने ठेचून एकाचा खून केल्या घटना पुढे आली आहे. यात राजू वसंत जाधव याचा मृत्यू झाला आहे. ही घटना हातकणंगले तालुक्यातील मजले येथे घडली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले आहे.
हातकणंगले तालुक्यातील मजले गावाच्या हद्दीत हातकणंगले कुंभोज रोडवर सागर सदाशिव सनदी यांची शेती आहे. त्यालगत खडी मिक्सर प्लँटजवळ मिलीभगतीमुळे गेली 10 ते 12 वर्षापासून एक महिला बेकायदेशीर गावठी दारू अड्डा चालवत होती. नेहमीप्रमाणे शिवपूरी येथील राजू वसंत जाधव हा आपल्या मित्रासोबत दारू अड्यावर गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास या दोघात कोणत्या तरी कारणाने वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. राजुच्या मित्राने रागाने दगडाने राजू जाधव याच्या डोक्यात घाव घातला. त्याचबरोबर तोंडावर वार करुन त्याला ठार केले. या घटनेची माहिती हातकणंगले पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयीत दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अवैध दारू अड्यावरही या प्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा -नामांकित लॅबच्या नावे बनावट कोविड निगेटिव्ह अहवाल देणारी टोळी गजाआड