कोल्हापूर - प्रश्नोत्तराच्या तासात विद्यापीठ प्रशासनाने खोटी उत्तरे दिल्याने विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा संघटना यांनी सभात्याग करीत विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी आजच्या सिनेट सभेत गोंधळ उडाला. घोषणाबाजी करीत विद्यापीठ प्रशासनाच्या गैरकारभाराचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा - ...अन्यथा राजकीय चक्र सुरूच आहे; त्यांना खाली यायला वेळ लागणार नाही
२३ प्रश्नापैकी तीन प्रश्नावर वादळी चर्चा झाली. अधिसभा सदस्य आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात खडाजंगी झाली. अधिसभा सदस्य एल.जी. जाधव यांनी खोटी माहिती दिली, त्यावर स्तगन प्रस्ताव मांडला. कुलगुरू यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे, गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास तीनच प्रश्नावर संपला. शिवाजी विद्यापीठातील काही कर्मचारी, अधिकारी यांनी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत काय, त्याची पडताळणी प्रशासनाने केली आहे काय, असा प्रश्न विचारल्यानंतर खोटे उत्तर दिल्याने काही विद्यार्थी संघटनांचे हितसंबंध जपत अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. आयोगाकडे तक्रार केली असून त्याची प्रत विद्यापीठाला सादर केली आहे. तरीही संबंधित व्यक्तीला पदोन्नती मिळालेले नाही. त्यामुळे, कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी विकास आघाडीचे सिनेट सदस्य मधुकर पाटील यांनी केली.
कारवाईच्या आश्वासनानंतर दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात
सदर प्रश्नावर विद्यापीठ प्रशासन आणि अधिसभा सदस्य यांच्यात खडाजंगी झाली. कुलगुरूंनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल अर्धा तासाने दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात झाली. शिक्षण सहसंचालक कार्यालयात गेल्या आठ वर्षापासून काही कर्मचारी व अधिकाऱ्यांची वेतन निश्चिती रखडली आहे. कारवाई करण्यास नेमका किती कालावधी लागतो, हे सभागृहाने नमूद करावे. गट राजकारणातून अधिकाऱ्यांची वेतन निश्चिती हटवली जाते, तसेच काही अधिकारी संघटनांच्या कार्यालयाला भेटी देऊन विद्यापीठाची बदनामी करतात, तरी विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. यावर, पुरावे सादर करा. संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करू, अशी सूचना डॉक्टर प्रताप पाटील यांनी केली. या प्रश्नावर विद्यापीठ प्रशासनाने खोटी उत्तरे दिल्याने सदस्यांनी सभात्याग केला.
हेही वाचा - अंबाबाईच्या दर्शनाची वेळ पुन्हा वाढवली; सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत दर्शन