ETV Bharat / state

Valentine Day : असाही व्हॅलेंटाईन डे! मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्या मनातील भावना

व्हॅलेंटाईन डे दिवशी कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीवेळी अनोखे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे. मतपेटीतून चक्क 6 ते 7 पत्र मिळाली असून मतदारांनी नेत्यांना चांगलेच झापले आहे.

Kumbi Kasari Election
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना
author img

By

Published : Feb 14, 2023, 10:07 PM IST

कोल्हापूर : आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीला पत्र लिहून आपल्या मनातली भावना कळवत असतात. मात्र, कोल्हापूरात याच व्हॅलेंटाईन डे दिवशी कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीवेळी अनोखे पत्र चर्चेचा विषय झाला आहे. मतमोजणी वेळी मतपेटीतून चक्क 6 ते 7 पत्र मिळाली असून त्यामध्ये अनेक नेत्यांना मतदारांनी सुद्धा चांगलेच झापले आहे. आज सकाळपासून रमणमळा इथल्या शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरवात झाली आहे. मतपेट्यात नेत्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठ्या देखील सापडल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

Kumbi Kasari Election
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना

कुंभीच्या निवडणुकीत चुरस : 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आज जगभरात साजरी होत आहे. असे, असताना कोल्हापुरात आज कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेचे पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तींना मग ते मित्र असो प्रियकर असो त्यांना आपल्या मनातील भावना कळवत असतात. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मतदार आपल्या नेत्याला आपल्या मनातील भावना या चिट्ठ्यां/पत्राद्वारे कळवल्या आहे. साहेबांचे समर्थक, एक्स वाय झेड, अशा नावांनी पत्र लिहीत आपल्या नेत्याला सल्ला, विरोधकांना मेसेज पत्रात लिहिले आहे. कुंभी कासारी सहकारी कारखान्याच्या या निवडणुकीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली.

Kumbi Kasari Election
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना

दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा येथे सध्या पणाला लागली आहे. कुंभी कासारी सहकारी कारखान्यात सध्या चंद्रदीप नरके यांची सत्ता होती. मात्र, यंदा सत्ता हलवण्यासाठी आमदार पी एन पाटील यांनी देखील जोर लावला. यामुळे या निवडणुकीत चंद्रदीप तडके आणि पी एन पाटील या दोघांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली होती. जोरदार प्रचारामुळे यंदा मतदानाचा आकडा देखील वाढला करवीर पन्हाळसह पाच तालुक्यातील 105 मतदान केंद्रावर ८२.४५% इतके मतदान झाले या वेळी अनेक मतदारांनी मतपत्रिकेबरोबरच चिठ्ठ्या देखील टाकल्या.

पत्रात काय म्हंटले आहे ? : यामध्ये मतदाराने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या असून आपल्या साहेबांकडून विरोधकांना कान चिमटे देखील दिले आहेत. 'चंद्रदीप नरके यांचे कारखाना चालवायची, सभासदा प्रती असलेली तळमळ विरोधी नेत्यांना नाही हे लोकांना माहीत आहे'. 'पुढाऱ्यांनो सत्ता येथे जाते सर्वसामान्यांना त्रास, देऊ नका. या राज्यात किती आले आणि गेले. तुम्ही ही कायमच टिकणार नाही. मागे काय घडल विसरू नका. दुसऱ्याला त्रास दिला की पुढचे दिवस वाईट येतात. जैसे कर्म वैसे फल'; अशा अनेक प्रकारचे पत्र या मतदान पेटीत मिळून आले आहेत. देशात लोकशाही असले तरी अनेक जण आपले मत हे उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत. मात्र, या निवडणुकीत मतदान पेटीच्याद्वारे आपले मनातल अनेक मतदारांनी समोर आणला आहे. तसेच नेत्यांप्रती असलेले प्रेम, विरोधकांनबद्दल असलेली ईर्ष्या तसेच सर्व नेत्यांना सल्ला मतदारांनी दिला आहे.

Kumbi Kasari Election
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना

निकालाच्या पहिल्याच फेरीची मोजणी सुरू : दरम्यान, मतमोजणीला कमालीचा विलंब झाला आहे. सायंकाळपर्यंत पहिल्याच फेरीची मतमोजणी सुरू होती. सायंकाळी साडे 6 नंतर दुसरी फेरी सुरू झाली आहे. तर अजूनही 1 फेऱी होणार आहे. पहिल्या फेरीत पुढीलप्रमाणे कल हाती आले आहेत.

  • पहिली फेरी पहिला गट
    नरके पॕनेल
    आनिल पाटील ३ हजार २४६
    भगवंत पाटील ३ हजार १४२
    बाजीराव शेलार ३ हजार १३८
  • शाहू आघाडी
    शिवाजी तोडकर ३ हजार ६१४
    एकनाथ पाटील ३ हजार ५२४
    युवराज पाटील ३ हजार २९५

  • पहिली फेरी दुसरा गट
    नरके पॕनेल
    राहूल खाडे ३ हजार २९७
    किशोर पाटील ३ हजार २२८
    दादासो लाड ३ हजार २७६
    उत्तम वरूटे ३ हजार २६७
    सर्जेराव हुजरे २ हजार ८३८

  • शाहू आघाडी
    बाजीराव खाडे ३ हजार ६२४
    परशुराम पाटील ३ हजार २१९
    बुध्धीराज पाटील ३ हजार ३९२
    सरदार पाटील ३ हजार ३००
    राजु सुर्यवंशी ३ हजार ९५५

  • पहिली फेरी तिसरा गट
    नरके पॕनेल
    विश्वास पाटील ३ हजार २२०
    सरदार पाटील ३ हजार २१२
    संजय बळवंत ३ हजार २२५
  • शाहू आघाडी
    आनंदा कृष्णा पाटील ३ हजार ४४६
    बाजीराव पाटील ३ हजार ४४७
    सर्जेराव पाटील ३ हजार ३०२

हेही वाचा - Navneet Rana : 'लिव्ह इन रिलेशनशिप'सह समलैंगिक विवाहावर खासदार नवनीत राणांचे मोठे विधान; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.