ETV Bharat / state

Kolhapur Municipal School : कोल्हापुरातील महापालिका शाळेचा व्हरांडा ठरतोय राज्यासाठी अनुकरणीय, पाहा स्पेशल रिपोर्ट

कोल्हापुरातील महापालिकेच्या एका शाळेने ( Kolhapur Municipal School ) विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव असा उपक्रम राबवला आहे. शाळेतील व्हरांड्यात विद्यार्थ्यांसाठी रंगरंगोटी केली ( Kolhapur Municipal School Open Space Coloring ) आहे. त्यामुळे मुलांचा मानसिक, बौद्धिक विकास होत आहे.

Kolhapur Municipal School
Kolhapur Municipal School
author img

By

Published : Mar 4, 2022, 9:53 PM IST

कोल्हापूर - कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे मुलांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी कमी झाली आहे. त्यामुळे हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची एक शाळा अभिनव असा उपक्रम राबवत ( Kolhapur Municipal School Open Space Coloring ) आहे. ज्यामुळे मुलांच्या मानसिक, बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही होण्यास मदत होत आहे.

एकीकडे शासकीय शाळांमधील मुलांची पटसंख्या घटत आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. त्याला पाहिजे तसे यश मिळत नाही. मात्र, कोल्हापुरातल्या रविवार पेठ येथील ( Kolhapur Ravivar Peth ) महापालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालयात ( Kolhapur Shelaji Vannaji Municipal School ) एक स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे मुलांची शाळेत दररोज शंभर टक्के हजेरी लागत आहे. पालक वर्गातही समाधान व्यक्त होत आहे.

शाळेतील मुलांसाठी काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे, अशी कल्पना शाळेचे मुख्याध्यापक संजय नार्वेकर, सहाय्यक अध्यापिक गीता घाटगे आणि सहाय्यक अध्यापक विजय देसावळे यांना सुचली. त्यानुसार एका रंगकर्मीला बोलवून व्हरांड्यात इंग्रजी वाचन, लेखनासाठी 1 ते 100 पर्यंतचे अंक, बेरीज, वजाबाकी अशा मूलभूत क्रियांसह घड्याळाची सुद्धा रंगरंगोटी केली आहे. मुले A पासून Z पर्यंत योग्य अल्फाबेट्सवर उड्या मारत अभ्यास करत आहेत. शिक्षणासोबत खेळ खेळायला मिळत असल्याने मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे.

कोल्हापूर शेलाजी वन्नाजी विद्यालय

सहाय्यक अध्यापिका गीता घाटगे यांनी सांगितले की, 'आनंदे शिकूया' या ज्ञानरचनावादी शैक्षणिक कृतींवर आधारित आगळ्या वेगळ्या प्रकारे शाळेचा व्हरांडा रंगवून घेतला आहे. ज्याच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाबरोबरच त्यातून आनंद मिळत आहे. लॉकडाऊनमुळे मुलांना केवळ ऑनलाइन शिक्षण मिळाले आहे. शिवाय त्यांची अभ्यासाबद्दलची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांची गोडी वाढावी तसेच त्यांनी जास्तीत जास्त वेळ शैक्षणिक कृतीत जावा यासाठी हा विचार डोक्यात आला होता. त्यानुसार मुलांची अभ्यासाबाबत गोडी वाढली असल्याचेही घाटगे म्हणाल्या.

दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक संजय नार्वेकर आणि सहाय्यक अध्यापक विजय देसावळे यांनी शासकीय शाळेतील मुलांची पटसंख्या कायम ठेवणे मोठे आव्हानात्मक असल्याचे म्हटलं आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेने यापद्धतीने विविध उपक्रम राबवण्याची गरज आहे. मुलांमध्ये एक वेगळी गोडी तसेच, उर्जा यामुळे निर्माण होत आहे. त्यामुळे मुले आनंदी राहतात, शिवाय शाळेची दररोजची हजेरी सुद्धा शंभर टक्के होत आहे. आजपर्यंतच्या अशा विविध उपक्रमामुळे आपल्याच शाळेची पटसंख्या 18 वरून सद्यस्थितीत 50 पर्यंत पोहोचली असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

शाळेच्या व्हरांड्यात काय?

  • इंग्रजी वाचन लेखनासाठी अल्फाबेट्स आणि फिनिक साउंड
  • 1 ते 100 आणि त्यापुढील अंकज्ञानासाठीची खेळ कृती
  • वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, षटकोन अशा विविध प्रकारचे शेप असलेली चित्रे
  • गणितीय - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रियांसाठी चौकटी
  • 1 ते 100 नंबर तसेच विविध स्पेलिंगबाबतच्या ऍक्टिव्हिटी
  • बहुउपयोगी घड्याळ - या घड्याळाच्या चित्रामध्ये घड्याळाच्या ज्ञानांबरोबरच कोन मापन, दिशा, कालमापन, आदी गटातून खेळ खेळता येऊ शकतात. हे सर्व खेळ ज्ञानरचनावादावर आधारित आहेत. ज्यामुळे मानसिक, बौद्धिक विकासाबरोबरच मुलांच्या शारीरिक विकासासाठीही मदत मिळणार आहे.

हेही वाचा - Transgender Wedding in Beed : महिला दिनी होणार किन्नर सपना आणि बाळूचा अनोखा विवाह सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.