ETV Bharat / state

मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती खासदार संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सर्व पक्षांचे प्रतिनिधी होते उपस्थित - EWS

मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज गुरुवार, (दि. 2 सप्टेंबर)रोजी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी आपण या विषयावर अभ्यास करणार असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले आहे. अशी माहिती संभाजीराजेंनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

author img

By

Published : Sep 2, 2021, 10:54 PM IST

दिल्ली (कोल्हापूर) - मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हणत समाजाची ही वास्तविकता राष्ट्रपतींपुढे मांडून त्यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती संभाजीराजे यांनी यावेळी केली आहे. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते.

छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

'EWS प्रमाणे 50 टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न करावेत'

या भेटीदरम्यान संभाजीराजे यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्यापुढे विविध विषयांवर यावेळी चर्चा केली. 105 व्या घटनादुरूस्तीनंतर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करण्यात आला. त्यामार्फत मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल तयार केला. मराठा समाजास आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. यासाठी 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने असामान्य परिस्थिती सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच, इंद्रा साहनी खटल्यात सांगितल्या प्रमाणे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच अतिदुरवर आणि अतिदुर्गम परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष केंद्र सरकारमार्फत अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. अशी माहिती संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींकडे दिली आहे. तसे, शक्य होणार नसेल तर (EWS)प्रमाणे 50 टक्क्यांची मर्यादा उठवण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल, असेही मतही संभाजीराजेंनी यावेळी राष्ट्रपतींपुढे व्यक्त केले आहे.

'पुढील कार्यवाही करण्यासाठी 'या' विषयावर अभ्यास करणार'

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजीराजे यांच्यासह उपस्थित सर्वपक्षीय प्रतिनिधींचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी आपण या विषयावर अभ्यास करणार असल्याचे राष्ट्रपतींनी यावेली सांगितले अशी माहिती संभाजीराजेंनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.