कोल्हापूर - 'चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते'. हा बाजीराव मस्तानी चित्रपटातील डायलॉग रणवीरसिंग मोठ्या रुबाबात म्हणतो, पण 70 वर्षांपूर्वी भारतामधून हीच चित्त्याची जात कायमचीचं नामशेष झाली. त्याच चित्त्यांना आता थेट आफ्रिकेतून पुन्हा भारतात आणण्यात आले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का एक काळ होता जेंव्हा छत्रपती शाहू महाराज याच चित्त्यांना शिकारीसाठी पाळत होते. एक दोन नव्हे तर तब्बल 35 हुन अधिक चित्ते त्यांनी पाळले होते. पाहुयात 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट...
चित्त्यांकडून शिकारीचा राजेशाही खेळ - सर्वोच्च न्यायालयाने आफ्रिकन चित्ता भारतात आणण्यास 2020 मध्ये हिरवा कंदील दाखवला. मात्र प्रत्यक्षात चित्ता कधी येईल याबाबत सर्वांना उत्सुकता होती. जगातील सर्वात चपळ प्राणी म्हणून चित्त्याला ओळखले जाते. पण हे चित्ते भारतातून 70 वर्षांपूर्वी नामशेष झाले. मात्र एक काळ होता जेंव्हा राजर्षी शाहू महाराज शिकारीसाठी हे चित्ते पाळत होते. त्यांना शिकारीची प्रचंड आवड होती. चित्त्याकडून शिकार करून घेता येते हे समजल्यानंतर शाहू महाराजांनी शिकारीसाठी चित्ते पाळले Chhatrapati Shahu Maharaj kept 35 Cheetah होते. शिकारीचा हा एक राजेशाही खेळ Cheetah herding royal game of hunting होता.
चित्त्यांना राहण्यासाठी चित्तेखाना आणि सांभाळ करणारे चित्तेवाल सुद्धा - शिकारीसाठी आणलेल्या या चित्त्यांना प्रशिक्षणही दिले जायचे. चित्त्यांच्या निगराणीसाठी शाहू महाराजांनी हैदराबाद संस्थानामधून चित्तेवान म्हणजेच चित्ते सांभाळणाऱ्या दोघांना बोलावून घेतले होते. शिकारीसाठी पाळलेल्या चित्त्यांना चित्तेखान्यात ठेवले जायचे. कोल्हापुरातल्या बसस्थानक परिसरात आजही चित्तेखाना ही वास्तू पाहायला मिळते. या चित्त्यांचा सांभाळ करणाऱ्या चित्तेवालांचे वंशज आजही शहरातील बिंदू चौक परिसरात राहतात. चित्त्यांना अंघोळ घालणे त्यांची त्यांची निगा राखण्याचे काम या चित्तेवानांकडे होते, असे कोल्हापूरातील चित्तेवान खानदानातील चौथे वंशज अमजद चित्तेवाल यांनी ईटीव्ही भारताला सांगितले.
1960 साली शेवटच्या चित्त्याची नोंद - भारतीय चित्ता जगामध्ये प्रसिद्ध होता. शिकाऱ्यानेच शिकार केल्यामुळे मात्र, आता चित्ता नामशेष झाला आहे. भारतामध्ये रजूपत राजे, हैदराबादचे नवाब आणि कोल्हापूरचे राजे चित्त्यांकडून शिकार करून घेण्यात प्रसिद्ध होते. शाहू महाराजांनी चित्त्यांकरवी शिकार वाढवली. चित्त्यांकडून हरणांची शिकार करून घेतली जात होती. शाहु महाराजानंतर त्यांची देखभाल घेण्यात आली नाही. 1960 साली शेवटचा चित्ता पाहिला, असे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी म्हंटले आहे.
'या' पुस्तकात कोल्हापूर आणि चित्ते याबाबत सविस्तर उल्लेख - 'द एन्ड ऑफ अ ट्रेल, द चिता ऑफ इंडिया' या पुस्तकात भारतातील चित्त्यांचा इतिहास मांडला आहे. यामध्ये देशातील अनेक संस्थानांचा उल्लेख केला आहे. खास करुन कोल्हापूर संस्थानांचा उल्लेख पुस्तकात आहे. चित्त्यांकडून कशा पद्धतीने शिकार करून घेतली जात होती. त्यांची निगा कशी राखली जायची, हे फोटोसहित दाखवण्यात आले आहे. जवळपास ३५ चित्ते महाराजांच्या काळात शिकारीसाठी पाळले जात असल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षांपासून भारतात चित्ते आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण प्रत्यक्षात भारतात केव्हा चित्ते येणार? असा प्रश्न ईटीव्ही भारतने दोन वर्षांपूर्वी उपस्थित केला होता. मात्र आता ही उत्सुकता आता मिटली असून भारतात 8 चित्त्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतात चित्त्यांचा दबदबा पाहायला मिळणार आहे.