ETV Bharat / state

Chandrakant Patil on ED action : न्यायालयात जाऊन आपण निर्दोष आहे हे सिद्ध करा- चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला - संजय राऊत विरुद्ध चंद्रकांत पाटील

ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई ( ED action on Sanjay Raut ) केली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील ( BJP MH president Chandrakant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाण्यात घाण केली तर ती वर येणारच, असा टोला त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Apr 5, 2022, 7:39 PM IST

Updated : Apr 5, 2022, 7:57 PM IST

कोल्हापूर - संजय राऊत कोणी महान नेते नाहीत. ईडी व सीबीआय त्यांची कामे करत आहेत. संपत्ती दान करणार हे त्यांनी आम्हाला सांगू नये. आपण न्यायालयात जाऊन या कारवाईविरोधात दाद मागा. आपण काहीही चुकीचे केलेले नाही हे सिद्ध करावे. कर नाही तर डर कशाला म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ( Chandrakant Patil Slammed Sanjay Raut ) टीका केली आहे.

ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई ( ED action on Sanjay Raut ) केली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील ( BJP MH president Chandrakant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाण्यात घाण केली तर ती वर येणारच, असा टोला त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

संजय राऊत यांच्यावर जे संस्कार आहेत तेच ते बोलतात- चंद्रकांत पाटील म्हणाले, की संजय राऊत माझ्यावर अनेक वेळा बोलले. विशेष म्हणजे सामनामधून अनेक वेळा बोलायचे. शेवटी मी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहले. राऊत यांची काय भाषा आहे याची जाणीव करून दिली. आज जे बोलले त्यात नवीन काहीही नाही. त्यांच्यावर जे संस्कार आहेत तेच ते बोलतात. सुरुवातीला यांची प्रवचने लोक बघत होते, आता कंटाळली आहेत. राऊत यांनी भाजपच्या नेत्यांनी सुद्धा चौकशीला तयार राहावे असे म्हटले आहे. त्यावरसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचे सांगितले. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही काही चूक केली असेल तर आम्हाला शासन झालेच पाहिजे. त्यानुसार त्यांनी धमक्या देऊ नये. चौकशी करा, चूक झाली असेल तर आम्हालासुद्धा शासन होऊ देत असे, चंद्रकात पाटील म्हणाले.

संजय राऊत यांची मालमत्ता जप्त-शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut Property Seize By ED) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याबरोबर ८ भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅट देखील ईडीने जप्त केला आहे. 1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली होती. दरम्यान, संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला गेले आहेत.

हेही वाचा-Sanjay Raut Property Seize By ED : शिवसेना नेते संजय राऊतांविरोधात ईडीची मोठी कारवाई; ११.१५ कोटींची मालमत्ता जप्त

हेही वाचा-Raj Thackeray Sabha Thane : येत्या 9 एप्रिलला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार!

Last Updated : Apr 5, 2022, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.