कोल्हापूर - पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्यमंत्री संजय राठोड यांच्यावर सोमवारपूर्वी कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा तोंड न उघडणाऱ्या या सरकारला विधानभवनामध्ये तोंड उघडू देणार नसल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. शिवाय पूजा चव्हाण प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले असून सरकार अजूनही का गप्प आहे असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर ज्यांनी देशाच्या राजकारणात भरीव काम केले आणि नेहमीच अन्यायाच्या विरोधात कडक भूमिका घेणारे शरद पवारसुद्धा पूजा चव्हाण प्रकरणावर काहीच बोलायला तयार नाहीयेत असेही पाटील म्हणाले. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संजय राठोड निर्दोष आहेत सिद्ध करा अन्यथा रजीनामा घ्यापत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी काही सवाल उपस्थित केले. पूजा चव्हाणचे काही ऑडिओ क्लिप समोर आली आहेत. त्यातील आवाज कोणाचे आहेत? पूजा चव्हाणने आत्महत्या करू नये म्हणून दोन बॉडीगार्ड ठेवले होते ते कुठे आहेत? ज्यांनी गर्भपात केला ते डॉक्टर कुठे आहेत? पुजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुठे आहे ? या सर्वांची माहिती लोकांना द्या. लोकांच्या मनात संशय निर्माण झाले आहेत. एकतर संजय राठोड निर्दोष आहेत हे सिद्ध करा किंवा संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
संजय राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावातुमचा राजीनामा मागण्याआधी स्वतः राजीनामा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले असल्याची चर्चा सुरू आहे. यावर जास्त बोलणे उचित नाही. मात्र, एखादा मंत्री राजीनामा देत नसतील तर त्यांना त्यांच्या पदावरून खाली घेण्याचा अधिकारसुद्धा मुख्यमंत्र्यांना असतो असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले.
चित्रा वाघ यांच्यापाठीशी भाजपकोणत्याही चौकशीची भीती दाखवून वाघिणीसारख्या लढत असलेल्या चित्रा वाघ यांना तुम्ही गप्प बसवू शकणार नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. चित्रा वाघ यांच्या पतीने आर्थिक हेराफेरी केली असल्याचा ठपका ठेवत त्यांची चौकशी केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यांची चौकशी करा मात्र, अशा चौकशीची भीती दाखवून कार्यकर्त्यांनाा भीती दाखवू नका. आम्ही चित्रा वाघ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
संजय राऊत यांना जे सुचेल ते मांडण्याची सवय
पेट्रोलचे दर वाढत आहेत, हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याबाबत भाजप आंदोलन करत नाही. त्यांनी जर आंदोलन केले तर आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांना जे सुचेल ते मांडायची सवय आहे. बहुतेक ते वाचत नसावेत किंवा ते त्याकडे कानाडोळा करत असावेत. जागतिक स्थरावर कशापद्धतीने बॅरेलचे दर वाढत चालले आहेत याबाबतचा चार्ट प्रसिद्ध केला आहे. दुसरासुद्धा एक चार्ट प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकार इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कर आकारत आहे. त्यामुळे आम्ही नक्की आंदोलन करू मात्र. महाराष्ट्र सरकार विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागेल. पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलसुद्धा जीएसटीमध्ये घेऊ असे म्हंटले आहे. त्यामुळे सर्व राज्यांचे करसुद्धा एक समान होतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.