ETV Bharat / state

Kolhapur By Election : चंद्रकांत दादांनी मन मोठे करायला हव होते - जयश्री जाधव - कोल्हापूरमध्ये पोटनिवडणुकीतील उमेदवार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जाधव यांच्या निधनांनंतर मला भेटले. त्यावेळी त्यांनी मला विचारले आपण भाजपच्या आहात त्यामुळे तुम्ही भाजपमधून लढा. (Kolhapur By Election 2022) मात्र, मी त्यांना त्यावेळी चंद्रकांत जाधव यांनी जो झेंडा हाती घेतला होता तोच झेंडा मी हाती घेऊन लढणार असल्याचे सांगितले. परंतु, त्यावेळी चंद्रकांत दादांनी मन मोठे केले नाही अशी खंत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी व्यक्त केली. त्या कोल्हापूरात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होत्या.

कोल्हापुरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांची प्रचारसभा

author img

By

Published : Mar 21, 2022, 7:24 AM IST

कोल्हापूर - दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी निवडून आल्यानंतर कधीही जनतेच्या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही. सतत लोकांच्या सेवेचा त्यांनी विचार केला. त्यामुळेच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जयश्री जाधव यांना मोठ्या मतांनी निवडून देऊ. (Congress candidate Jayashree Jadhav) आम्हीसुद्धा राष्ट्रवादीकडून सर्वात पहिला पाठिंबा दिला. (Kolhapur By Election) त्याचवेळी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत बोललो. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनापासून प्रचारात उतरले असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

कोल्हापुरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांची प्रचारसभा

जयश्री ताई तुम्ही काळजी करू नका शिवसैनिक आपल्या पाठीशी : दुधवडकर

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनीही राजेश क्षीरसागर यांना थोडो दुःख झाले असले तरी ते कट्टर शिवसैनिक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा आदेश ते पाळणार आणि त्यांना तो पाळावाच लागेल असे म्हटले. तसेच, सर्व शिवसैनिक आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास जयश्री जाधव यांना दिला. (Hasan Mushrif Kolhapur by-election) दरम्यान, आमचे शिवसैनिक राजेश क्षीरसागर यांनी या ठिकाणी दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ते इथून इच्छुक असणे काही चुकीचे नाही. असही ते म्हणाले.

पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसैनिक आपल्या पाठीशी

याचवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तरची जागा आपपल्या काँग्रेसला निवडणून द्यायची आहे असा आदेश दिला आहे. नाराजी असणे गैर नाही ती आम्ही दूर करू. मात्र, जरी नाराजी असली तरी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने उतरतील. शिवाय आपण कोणतीही काळजी करू नका, आम्ही तसेच क्षीरसागरसुद्धा पूर्णपणे आपल्या पाठीशी उभे राहू असेही दुधवडकर यांनी म्हटले.

चंद्रकांतदादांनी मोठेपणा दाखवायला पाहिजे होता : जयश्री जाधव

यावेळी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी जाधव यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच, जाधव यांनी नेहीमीच जनतेचा विचार केल्याचे म्हटले आहे. जेंव्हा जाधव यांचे निधन झाले त्यावेळी घरातले म्हटले परत राजकारणात नाही पडायचे. मात्र, अंत्ययात्रेला झालेली गर्दी त्यानंतर लोकांनी भेट घेऊन आपण रडत बसू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे बोलत मला बळ दिल्याचे जयश्री जाधव यांनी म्हटले.

त्यांनी जो झेंडा हाती घेतला, तोच झेंडा मी हाती घेऊन लढणार

बिनविरोध करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या भेटीबद्दलसुद्धा सांगताना त्या म्हणाल्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जाधव यांच्या निधनांनंतर भेटले. त्यांनी मला विचारले आपण भाजपच्या आहात त्यामुळे तुम्ही भाजपमधून लढा. मात्र, मी त्यांना त्यावेळी सांगितले चंद्रकांत जाधव यांनी जो झेंडा हाती घेतला होता तोच झेंडा मी हाती घेऊन लढणार आहे. मात्र, त्यावेळी चंद्रकांतदादांनी मन मोठं करायला हव होत त्यांनी ते केले नाही. शिवाय भावाप्रमाणे पालकमंत्री सतेज पाटील तसेच ग्रामविकासमंत्री मुश्रीफ पाठीशी राहिले. त्यामुळे उत्तरमधील जनतेनेसुद्धा आता मला साथ द्यावी अशी विनंतही त्यांनी यावेळी केली आहे.

विरोधी उमेदवार स्वताहून उमेदवारी अर्ज माघारी घेतील : आमदार ऋतुराज पाटील

यावेळी बोलताना ऋतुराज पाटील म्हणाले, चंद्रकांत जाधव यांनी उद्योगाबरोबरच अनेक कोल्हापूरकरांशी वेगळे नाते तयार केले होते. महापूर तसेच कोरोनाकाळात त्यांनी चांगले काम केले. जाधव यांचे जे काम सुरू होते त्यांच्या मागे खंबीरपणे त्यांच्या पत्नी जयश्री जाधव उभ्या असायच्या. जाधव हे कोरोना काळातही रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधायला जात होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. मागील अडीच वर्षात जे काम केले आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. शिवाय एकी असते तेंव्हा पुढच्या व्यक्तीला नक्कीच घाम फुटतो. त्यामुळे आज जी व्यासपीठावर एकी दिसत आहे ती पाहून विरोधी उमेदवार अर्ज मागे घेतील असही पाटील यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा - आम्ही आरएसएसला मुस्लिम संघ म्हणायचं का? भाजपला सोडलंय, हिंदुत्वाला नाही.. पहा उद्धव ठाकरेंचे संपूर्ण भाषण..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.