ETV Bharat / state

रात्रीस खेळ चाले... कोल्हापुरातील आमदाराच्या घरासमोर भानामती

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या घरासमोर चक्क भानामतीचा प्रकार घडला आहे. अमावस्याच्या रात्री घरासमोर असलेल्या झाडाला पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेली काळी बाहुली दिसून आल्याने सर्वत्र एकच चर्चा पाहायला मिळत आहे. त्यांच्या घरासमोर आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सतेज पाटील
author img

By

Published : Mar 7, 2019, 8:50 PM IST

कोल्हापूर - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या घरासमोर चक्क भानामतीचा प्रकार घडला आहे. अमावस्याच्या रात्री घरासमोर असलेल्या झाडाला पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेली काळी बाहुली दिसून आल्याने सर्वत्र एकच चर्चा पाहायला मिळत आहे. त्यांच्या घरासमोर आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातील कसबा बावड्यामधील यशवंत निवास येथे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे राहतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घरासमोर अनोळखी व्यक्तीकडून भानमतीचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. सतेज पाटील यांच्या घरासमोरील याच झाडावर गेल्या आठवड्यापासून दोन वेळा पांढऱ्या कपड्यात हळदी, कुंकू लावलेली बाहुली बांधून ठेवल्याचे आढळले होते.

हा प्रकार होऊन चार दिवस उलटत नाहीत तोपर्यंत दुसऱ्यांदा अमावस्येच्याच मध्यरात्री हा प्रकार घडला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काळ्या जादूवर विश्वास ठेऊन काही ना काही करण्याचा उद्योग पाहायला मिळतो. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीमध्येही अशा प्रकारच्या काळ्या जादूचा काही उमेदवारांनी अवलंब केल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. मात्र, आता चक्क आमदार सतेज पाटील यांच्याच घरासमोर अशा प्रकारच्या भानामतीचा प्रकार समोर आल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.

undefined

त्यानंतर तात्काळ त्यांच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Intro:अँकर- काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या घरासमोर चक्क भानामतीचा प्रकार घडला आहे. अमावस्याच्या रात्री घरासमोर असलेल्या झाडाला पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेली काळी बाहुली दिसून आल्यान सर्वत्र एकच चर्चा पाहायला मिळत आहे. आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडली आहे.Body:व्हीओ- आपण जी दृश्ये पाहताय ही सर्व दृश्ये आहेत कोल्हापुरातील कसबा बावड्यामधील यशवंत निवासाची. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे हे निवासस्थान. पण गेले काही दिवसांपासून घरासमोर कोणी अनोळखी व्यक्तीकडून भानमतीचे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. सतेज पाटील यांच्या घरासमोरील याच झाडावर गेल्या आठवड्यापासून दोन वेळा पांढऱ्या कपड्यात हळदी, कुंकू लावलेली बाहुली बांधून ठेवल्याचे आढळून आले होते. हा प्रकार होऊन चार दिवस ओलांडतात तोपर्यंत दुसऱ्यांदा आज दुसऱ्यांदा अमावस्येच्याच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काळ्या जादूवर विश्वास ठेऊन काही ना काही करण्याचा उद्योग पाहायला मिळतो याचे कोल्हापूर जिल्ह्याला काही नवीन नाही. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीमध्येही अशा प्रकारच्या काळ्या जादूचा काही उमेदवारांनी अवलंब केल्याचे यापूर्वी अनेकदा पुढे आले आहे. पण आता चक्क आमदार सतेज पाटील यांच्याच घरासमोर अशा पद्धतीच्या भानामतीचे प्रकार समोर आल्याने विविध चर्चांना उत आला आहे. त्यानंतर तात्काळ घराच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येत असून झालेल्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.