ETV Bharat / state

भाजपाकडून गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपा कार्यालयात मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन बँक करण्यात येत आहे. आज कोल्हापूर भाजपाच्यावतीने भाजपा कार्यालय बिंदू चौक येथे सध्याच्या काळात कोविड रुग्णांना उपयुक्त असणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचा शुभारंभ, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

भाजपाकडून गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा
भाजपाकडून गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा
author img

By

Published : May 8, 2021, 7:15 PM IST

कोल्हापूर - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपा कार्यालयात मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन बँक करण्यात येत आहे. आज कोल्हापूर भाजपाच्यावतीने भाजपा कार्यालय बिंदू चौक येथे सध्याच्या काळात कोविड रुग्णांना उपयुक्त असणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचा शुभारंभ, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ, ऑक्सिजन प्लांट मधून कमी पुरवठा यामुळे सर्वत्र आज ऑक्सिजनची प्रमाणापेक्षा जास्त मागणी होताना दिसत आहे. अशा या पार्श्वभूमीवर सेवा कार्य म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे.

भाजपाकडून गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा

ऑक्सिजनचा तुटवडा दूर होण्यास मदत

याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोविड रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरीराची श्वसनक्रिया नैसर्गिक पद्धतीने सुरु होण्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हे मशीन डॉक्टरांच्या सल्यानुसार वापरायचे असून, घरी ऑक्सिजनची गरज आहे असे डॉक्टरांनी सुचविलेल्या गरजू रुग्णांसाठी ही सुविधा भाजपातर्फे मोफत सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम सुरू केल्यावर त्वरीतच ३० ते ३५ रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत मागणी केली आहे. मशीनची खरेदी रक्कम सध्या चढ्यादराने होत असून, सर्व सामान्य नागरिकांना एक स्वतंत्र मशीन खरेदी करणे परवडणारे नाही. त्याचबरोबर भाडेतत्वावर देखील अशा मशीन आता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विचार करता ही सेवा मोफत करण्यात येत आहे. एका रुग्णांकडून हे मशीन वापरून परत आल्यानंतर ते व्यवस्थित सॅनिटाईज करून दुसऱ्या रुग्णांला वापरण्यासाठी दिले जाणार आहे. सध्या बाजारात या मशीनचा तुटवडा असल्याने जिथून शक्य होईल तिथून हे मशीन उपलब्ध करण्याचा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, ग्रामीण सरचिटणीस विठ्ठल पाटील यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - घरची परिस्थिती हलाखीची, तरीही शिर्डीची पायल करते विनामुल्य रुग्णसेवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.