ETV Bharat / state

BJP Condemned Pawar Statement : अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन

अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात आंदोलन करण्यात ( BJP Condemned Pawar Statement ) आले. भाजपने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ( Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in Kolhapur ) तीव्र जोरदार निदर्शने केले. यावेळी अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन करण्यात ( BJP protests Ajit Pawar statement in Kolhapur ) आले.

author img

By

Published : Dec 31, 2022, 8:07 PM IST

BJP Condemned Pawar Statement
BJP Condemned Pawar Statement
अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

कोल्हापूर - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा ( Winter session ) शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र ( Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray ) डागले. त्यांनी ठाकरे गटाकडून वारंवार होत असलेल्या टीकांचा खरपून समाचार घेतला. यातच विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य ( BJP protests Ajit Pawar statement in Kolhapur ) केले.

अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध - त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र जोरदार निदर्शने करून अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी अजित पवारचा धिक्कार असो, अजित पवारचे करायचे काय, खाली डोक वर पाय, धरणबहाद्दुर अजित पवार, जनता करेल तुला तडीपार, अजित पवार कौन रे पायतान मारा दोन रे अशा घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त केला.

पवार कुटुंबाला आज धडा शिकवण्याची वेळ - यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो अशा धर्मवीर छ. संभाजी महाराजांना अजित पवार म्हणतात कि, छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. छ. संभाजी महाराजांनी आपल्या देहाची हाल अपेष्टा सहन केली. पण धर्म बदलला नाही, औरंगजेबला टक्कर दिली. अशा महाराजांना बोलण्याचे धाडस अजित पवार यांनी केले.

जनतेची दिशाभूल - पवार घराणे कायम धर्मावरती राजकारण करत आले आहे. कधी आपल्या धर्मा विषयी चांगले बोललेले नाहीत. अशा या पवार कुटुंबाला आज धडा शिकवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना चांगलाच धडा शिकवेल यात शंका नाही. प्रत्येक वेळी जातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम पवार कुटुंबाने केले. पण महाराष्ट्राची जनतेला चांगलेच माहित आहे कि, जशास तसे उत्तर कसे द्यायचे. नक्कीच महाराष्ट्राची जनता अजित पवार यांना त्यांची जागा दाखवून देईल असे सांगितले.

जिभेवरती भान ठेवून बोलले पाहिजे - यावेळी बोलताना भाजपा प्र.का सदस्य महेश जाधव म्हणाले कि, ज्या छ. संभाजी महाराजांनी आपल्या देशाचे नाव सातासमुद्रा पार नेले. अशा छ. संभाजी महाराज यांच्या विरुद्ध बोलून छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे, म्हणणाऱ्या अजित पवारचा धिक्कार असो असे सांगितले.

संभाजी महाराज यांच्या विरुद्ध बोलणे चुकीचे - धर्मवीर छ. संभाजी महाराजांना धर्मवीर हे कोणत्या नेते मंडळीने नाही म्हणलेले हिंदुस्थानातील तमाम विदवानांनी छ. संभाजी महाराजांना धर्मवीर असे म्हणले आहे. पवार यांनी बोलताना जरा जिभेवरती भान ठेवून बोलले पाहिजे. छ. संभाजी महाराजांचा इतिहास बघितला तर छ. संभाजी महाराजांनी एकही लढाई हारलेली नाही अशा, धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या विरुद्ध बोलणे चुकीचे आहे असे सांगत निषेध व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.