ETV Bharat / state

करवीर तालुक्यात आशा सेविकेला मारहाण; ग्रामपंचयात सदस्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

आयुष मंत्रालयाकडून वाटप करण्यात येत असलेल्या आर्सेनिक अलबम या होमिओपॅथिक गोळ्यांची नियमापेक्षा ज्यादा मागणी गावकऱ्यांनी केली. ते देण्यासाठी विरोध केल्याने करवीर तालुक्यातील खाटांगळे येथे आशा वर्करला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ASHA workers in kolhapur
करवीर तालुक्यात आशा सेविकेला मारहाण; ग्रामपंचयात सदस्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Jun 9, 2020, 4:55 PM IST

कोल्हापूर - आयुष मंत्रालयाकडून वाटप करण्यात येत असलेल्या आर्सेनिक अलबम या होमिओपॅथिक गोळ्यांची नियमापेक्षा ज्यादा मागणी गावकऱ्यांनी केली. ते देण्यासाठी विरोध केल्याने करवीर तालुक्यातील खाटांगळे येथे आशा वर्करला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यासह चौघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणार्‍यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत करवीर तालुक्यातील सर्व आशा वर्करसनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

शोभा अशोक तळेकर या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत. गावामध्ये महाआयुष कामकाजाचा सर्व्हे करत असताना त्या घरातील पन्नास वर्षाहून मोठ्या व्यक्तींना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करत होत्या.

मात्र याच दरम्यान ग्रामपंचायत सदस्या वैशाली कृष्णात पाटील यांच्या घरी आशा सेविका शोभा तळेकर गेल्या; आणि त्यांनी ज्यादा गोळ्यांची मागणी केली. तसेच नियमाहून जास्त गोळ्या देण्यास नकार दिला. तसेच यादीनुसारच गोळ्या वाटप करत असल्याचे सांगितले. मात्र सदस्या वैशाली पाटील यांनी गोळ्या देत नसल्याच्या कारणावरून कृष्णात बापू पाटील, एकनाथ बापू पाटील, पंडित बापू पाटील यांसह त्यांना मारहाण केली.

याबाबत शोभा तळेकर यांनी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. परंतु जोपर्यंत चारही दोषींना अटक होत नाही, तो पर्यंत करवीर तालुक्यातील आशा वर्करने सर्व काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.