कोल्हापूर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीनंतर पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी एक दिवसीय आंदोलना केले. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. मात्र, आजपर्यंत याचा शासनाने विचार केला नाही. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊन हा प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवावा अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
काय आहे नेमकी मागणी
महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांना सेवासमाप्तीनंतर 1 लाख रुपये व मदतनिसांना 30 वर्षांच्या सेवेनंतर 75 हजार रुपये लाभ मिळतो. या रक्कमेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वृद्धापकाळामध्ये निर्वाह होऊ शकत नाही. म्हणूनच या आर्थिक लाभा बरोबरच पेन्शन योजनाही लागू करावी, अशी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मागणी आहे. सध्या अंगणवाडीसेविकांना सुमारे 8 हजार 500 रुपये व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 5 हजार 750 रुपये त्याचबरोबर मदतनिसांना दरमहा 4 हजार 500 रुपये मानधन मिळते. त्यांच्या या मानधनाच्या 50 टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून द्यावी अशी संघटनेची मागणी आहे.
हेही वाचा - सॅनिटायझर बाटलीच्या स्फोटात भाजलेल्या महिलेचा मृत्यू; कागलमधील घटना
हेही वाचा - महापुराच्या झळा सोसलेले चिखलीकर आजही मदतीपासून वंचित