ETV Bharat / state

कागलची ऑनलाइन शाळा 'लयभारी', जिल्ह्यातील 42 हजार विद्यार्थ्यांना लाभ - कोल्हापूर जिल्हा बातमी

कोविडच्या प्रादुर्भावामुळे याही शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘डिजिटल पद्धतीने' झाली. मागील शैक्षणिक वर्षात अनेक शाळांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्यक्ष डिजिटल अध्ययन, अध्यापनात मात्र शिक्षक, विद्यार्थी व प्रशासनास विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांचा अभ्यास करत तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या दीप फाऊंडेशनने खास मराठी शाळांसाठी सर्वसमावेशक असा 'ऑनलाइन शाळा' नावाचा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

रेडी फॉरमॅटमध्ये बातमी असल्याने व्हिडिओ व बातमीत जास्त काही बदल केलेले नाही
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 23, 2021, 5:36 PM IST

कोल्हापूर - कोविडच्या प्रादुर्भावामुळे याही शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘डिजिटल पद्धतीने' झाली. मागील शैक्षणिक वर्षात अनेक शाळांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्यक्ष डिजिटल अध्ययन, अध्यापनात मात्र शिक्षक, विद्यार्थी व प्रशासनास विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांचा अभ्यास करत तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या दीप फाऊंडेशनने खास मराठी शाळांसाठी सर्वसमावेशक असा 'ऑनलाइन शाळा' नावाचा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कागल तालुक्यातील तसेच पारनेर, अहमदनगर व कर्जत-जामखेड या तालुक्यातील जवळपास 42 हजार सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

कागलची ऑनलाइन शाळा 'लयभारी', जिल्ह्यातील 42 हजार विद्यार्थ्यांना लाभ

काय आहे 'ऑनलाइन शाळा'

'ऑनलाइन शाळा' हा राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व प्रशासकीय अधिकारी यांना एकत्रित जोडणारा अॅण्ड्रॉइड प्लॅटफॉर्म आहे. सदर प्लॅटफॉर्मच्या मदतीने अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन, पूरक अध्यापन, स्वयंअध्ययन तसेच शाळा व्यवस्थापन या सर्व गोष्टी ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या राबवता येतात. हे प्रायोगिक तत्त्वावर सिद्ध झाले आहे. 'ऑनलाइन शाळा' सॉफ्टवेअरच्या टीचर लॉगीनला प्रत्येक शिक्षकाला स्वतंत्र डिजिटल लेसन प्लॅन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पण, 'ऑनलाइन शाळा' सॉफ्टवेअरच्या मॉनिटरींग डॅशबोर्ड ॲनालिटीक्सनुसार ज्या शिक्षक मित्रांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात रुची नाही किंवा जे शिक्षक आपला स्वतंत्र डिजिटल लेसन प्लॅन तयार करण्यात असमर्थ आहेत त्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षभरात शैक्षणिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.

'ऑनलाइन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी' ही राज्यतील पहिली व नाविन्यपूर्ण संकल्पना असून या संकल्पने अंतर्गत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विभाग पंचायत समिती कागल यांच्या सहकार्याने दीप फाऊंडेशनने कागल तालुक्यात अत्याधुनिक लेक्चर कॅप्चर स्टुडिओची निर्मिती केली आहे. या स्टुडिओमध्ये मराठी व सेमी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ॲक्च्युअल टीचिंग, इ-लर्निंग कंटेन्ट बँक बनवली जात आहे.

यासाठी 60 तज्ज्ञ शिक्षकांची निवड

यासाठी कागल पंचायत समितीचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी गणपती कमळाकर यांच्या मार्गदर्शनखाली 60 विषय तज्ज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना स्टुडिओतील तांत्रिक साधनाच्या मदतीने प्रत्यक्ष अध्यापन कसे करायचे याबाबतचे प्रशिक्षण तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी दिले. ॲक्च्युअल टीचिंग ई-लर्निंग कंटेन्ट व्हिडिओ निर्मितीस सुरुवात झाली आहे.

सेंट्रललाईज डिजिटल व्हिडिओ होणार तयार

या सेंट्रलाइज डिजिटल स्टुडिओमधून प्रत्येक विषयाच्या घटकावर वेगवेगळ्या विषय तज्ज्ञांचे तीन ते चार ॲक्च्युअल टीचिंग इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ बनवले जात असून विद्यार्थी आपल्या आवडत्या शिक्षकाला रेटिंग देऊ शकतील, अशी सुविधा देण्यात आली आहे. दीप फाऊंडेशनची टेक्निकल टीम तयार झालेल्या ई-कंटेन्टवर पोस्ट एडिटिंगचे काम करून ऑनलाइन शाळा स्टुडंट अॅपद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांला इंटरनेट शिवाय या ॲक्च्युअल टिचिंग ई-लर्निंग, कंटेन्ट बँकचा ॲक्सेस मिळणार असल्याने विद्यार्थी शिकण्यासाठी फक्त त्यांच्या वर्गशिक्षकांवर अवलंबून नसणार आहे.

जिल्ह्यातील 42 हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा

'ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी'द्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांला ऑफलाइन किंवा ऑनलाइन डिजिटल शिक्षण देऊन त्याचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढता येणार आहे. याचा जिल्ह्यातील 42 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच कागलमध्ये याचे यशस्वी उपक्रम पार पडल्यास राज्यभर ऑनलाइन शाळेचा उपक्रम राबवून जाणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - 'मोर्चा नको तर काय भजन करू का?' शेट्टींचा मुश्रीफांना टोला; स्वाभिमानी शेतकरी संघटेनाचा कोल्हापूरमध्ये आक्रोश मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.