कोल्हापूर - अंधेरी विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या नुकत्याच विजयी झाल्या आहेत. त्यांचा विजयोत्सव आज मंगळवार (दि. 8 ऑक्टोबर)रोजी कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी परिसरात मशाल रॅली काढून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत धनगरी ढोलच्या निनादात मशाल मिरवणूक काढली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक या मशाल रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी ही मशाल फक्त मशाल नसून क्रांतीची मशाल आहे आणि या क्रांतीच्या मशालीतून ऋतुजा लटके या विजय झाल्या असून भविष्यात याच मशालीतून विरोधकांच्या राख होईल असे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले आहेत ते आज कोल्हापुरात बोलत होते.
प्रमुख रस्त्यांवरून मशाल यात्रा - शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक पार पडली शिवाय या निवडणुकीत शिवसेनेला आपलं चिन्ह धनुष्यबाण सोडून मशाल या चिन्हावर अंधेरीची पोटनिवडणूक लढावी लागली या निवडणुकीत उमेदवार ऋतुजा लटके या विजय झाल्या आहेत. या विजयानंतर आज कोल्हापुरात जल्लोष साजरी करण्यात आला. कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांवरून मशाल यात्रा काढत शिवसेनेने हा जल्लोष साजरी केला आहे. संध्याकाळच्या सुमारास जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर, हर्षल सुर्वे यांच्यासह युवासैनिक व महिला एकत्र येत धनगरी ढोलच्या गजरात हातात मशाल घेत राहिलेला सुरुवात केली. ही रॅली मिरजकर तिकटी मार्गे महाद्वार रोड पापाची तिकटी शिवाजी महाराज चौकात आणण्यात आले. दरम्यान, प्रत्येकाच्या हातात धगधगती मशाल पाहायला मिळाली.
विश्वासघात केलेल्यांचा नाश करण्यासाठी ही मशाल - यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, अंतरी पोट निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके या मशाल चिन्हावर निवडून येत क्रांतीची मशाल पेटवली आहे आणि हे मशाल आज कोल्हापुरात ही पेटली असून आम्ही आज सर्वजण अंबाबाई चरणी प्रार्थना करत आहोत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मोठी ताकद द्यावी तसेच ज्यांनी मातोश्री बरोबर व ठाकरे बरोबर विश्वासघात केलाय त्यांचा राजकीय नाश करण्यासाठी ही मशाल पेटवली आहे. आणि यापुढे भविष्यातही आम्हाला मशाल चिनावर यश मिळणार आहे कारण केवळ सैनिक नाहीतर सामान्य जनता ही पेटून उठली आहे असे पवार म्हणाले आहेत.