कोल्हापूर : शाळेतील मुलींशी गैरवर्तन (Abuse Of Girl Students) केल्याचा धक्कादायक प्रकार (misbehaving with girl students) कोल्हापूरात समोर आला आहे. येथील पन्हाळा तालुक्यातील एका गावातील प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून याबाबत गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाविरोधात तक्रार (Complaint against teacher) केली आहे. आपल्या मुली शाळेत का जात नाहीयेत ही शंका जेव्हा पालकांना आली त्यानंतर चौकशी केली असता हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. Latest news from Kolhapur, Kolhapur Crime
नेमके काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथीच्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकाने लहान मुलींशी असभ्य तसेच लैंगिक वर्तन केल्याची बाब दोन दिवसांपूर्वी पुढे आली. दिवाळीच्या सुट्टीनंतर काही मुली शाळेला जाणार नसल्याच्या पवित्र्यामुळे पालकांच्यामध्ये संशय व्यक्त होऊ लागला. याविषयी मुलींच्याकडे पालकांनी चौकशी केली असता संबंधित शिक्षक आपल्याशी असभ्य लैंगिक वर्तन करत असल्याची मुलींनी पालकांसमोर माहिती दिली.
त्या शिक्षकाचा फोन स्विच ऑफ - पालकांना ही संतापजनक गोष्ट जेव्हा समजली तेव्हा सुरुवातीला याबाबत कोणीही आवाज उठवला नाही. याबाबत गावामध्ये सुद्धा दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. याबाबत ग्रामपंचायतीने सुद्धा पन्हाळा पोलीस ठाणे तसेच गटविकास अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करत संबंधित पवार या शिक्षकावर कारवाई करावी याबाबत मागणी केली होती. याबाबत संबंधित शिक्षकावर कोणत्या पद्धतीने कारवाई झाली नाहीये. या प्रकरणानंतर संबंधित शिक्षकाने पंधरा दिवसाचा रजेचा अर्ज मुख्याध्यापकाकडे पाठवून फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे. त्यामुळे आता नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.