ETV Bharat / state

'आप'च्या वतीने कोल्हापुरात शिवसेनेच्या वचननाम्याची होळी - Kolhapur Shiv Sena Latest News

शिवसेनेने आपल्या वचननाम्यात वीजबिल सवलतीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येताच शिवसेनेला आश्वासनाचा विसर पडला असा आरोप आपच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीकडून शिवसेनेच्या वचननाम्याची होळी करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

aap Leaders' agitation against Shiv Sena
'आप'च्या वतीने शिवसेनेच्या वचननाम्याची होळी
author img

By

Published : Nov 20, 2020, 4:07 PM IST

कोल्हापूर - शिवसेनेने आपल्या वचननाम्यात वीजबिल सवलतीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येताच शिवसेनेला आश्वासनाचा विसर पडला, असा आरोप आपच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीकडून शिवसेनेच्या वचननाम्याची होळी करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर 100 युनिटपर्यंत असलेल्या वीजबिलात सवलत देऊन गोड बातमी देऊ, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले होते. परंतु राज्य सरकारने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप आपच्या वतीने करण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या वचननाम्याची होळी करण्यात आली. तसेच शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. वीजबिल कमी करू म्हणणाऱ्या शिवसेनेने लॉकडाउनच्या काळात वाढीव वीजबिल देऊन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने वीजबिलात सूट देऊन सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी आपने केली. या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, जयवंत पवार, अमरजा पाटील यांच्यासह आपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

'आप'च्या वतीने शिवसेनेच्या वचननाम्याची होळी

काय होता शिवसेनेचा वचननामा?

आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार
प्रत्येक जिल्ह्यात महिला बचतगट भवन उभारणार
राज्यातील १५ लाख पदवीधर तरुणांना शिष्यवृत्तीची संधी देणार
अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी १० हजार रुपये थेट जमा करणार
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार
तालुका स्तरावर महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी एक्स्प्रेस' विशेष बसची सेवा सुरू करणार
राज्यातील सर्व खेड्यांमधील रस्ते टिकाऊ करण्याचे धोरण आखणार.

शहरांच्या विकासासाठी 'मुख्यमंत्री शहर सडक योजना' अंमलात अणणार.

सर्व नगरपरिषदा, नगरपालिका आणि महागनरपालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार
३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार

सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

१० रुपयांमध्ये सकस आहार देणार. राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त जेवणाची केंद्र स्थापन करणार
२०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत त्या १ रुपयात करणार
स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षणासाठी कायदा बनवणार
राज्य सरकारी नोकऱ्यातील सर्व रिक्तपदे भरणार
पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर 'मुख्यमंत्री आवास योजना' अंमलात आणणार

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

पोलीस भरतीमध्ये पूर्वीप्रमाणे प्रथम मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घेणार

हेही वाचा - जालन्यातील सीताफळांना दिल्लीत मिळतोय चौपट भाव; "विकेल ते पिकेल" धोरणाचा झाला फायदा

हेही वाचा - पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणताही हवाई हल्ला झालेला नाही; लष्कराचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.