कोल्हापूर - ज्या लोकांचे नुकत्याच झालेल्या महापुरामुळे जे नुकसान झाले आहे. त्या लोकांना (2019)च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. दरम्यान, पुर ओसरून महिना उलटला तरीही सानुग्रह(तातडीने मिळणारी मदत) अनुदानही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. शासनाने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहेका? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य शासनावर निशाणा साधला आहे.
मोर्चा नको तर काय भजन करू का?
राजू शेट्टी यांनी मोर्चा काढू नये असे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आवाहन केले होते. याबाबत विचारले असता, मोर्चा नको तर काय भजन करू का? असा उलट सवाल राजू शेट्टी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केला आहे. शिवाय यांनी केलेल्या टीकेलाही सभेमध्ये उत्तर दिले जाईल असही शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.