कोल्हापूर - पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम असल्यामुळे कोवाडच्या बाजारपेठेत अचानक पाण्यात वाढ झाली आहे. सध्या कोवाड बाजारपेठेत चार फूट पाणी आहे. अचानक पाणी पातळी वाढल्याने या ठिकाणी अडकलेल्या 50 पेक्षा अधिक नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.
पास रेस्क्यू फोर्सने हे बचावकार्य केले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाड आणि किणी परिसरात हे मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. जवळपास पाच तासांपासून अधिक काळ 'पास रेस्क्यू फोर्स'कडून प्रयत्न सुरू होते. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 12 पेक्षा अधिक जवान सहभागी झाले होते. गंभीर पूर परिस्थितीत जवानांनी केलेल्या बचाव कार्य कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर किंचित ओसरला असून पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा कमी होऊ लागली आहे. आज सायंकाळी पाणी पातळी 2 इंचाने कमी झाली असून सद्यस्थितीत राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी 44.9 इंच इतकी झाली असून गेल्या 4 तासांपासून ही पाणी पातळी स्थिर आहे.