कोल्हापूर - जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी, वारणा धरणांसह 11 प्रकल्पामधून विसर्ग सुरू केला आहे. 11 प्रकल्पातून प्रतिसेकंदाला 4 हजार 50 क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पंचगंगा, भोगावती, कासारी, तुळशी आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे, तर जिल्ह्यातील दोन मार्गावरील एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सद्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 25.1 फुटांवर पोहोचली आहे.
पाण्याखाली गेलेले बंधारे -
मुसळधार पावसामुळे एकूण २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
नदी | बंधारे |
पंचगंगा | शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ |
भोगावती | हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे |
कासारी | यवलूज |
तुळशी | बीड |
वेदगंगा | वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली |
वारणा | माणगाव व चिंचोली |
दूधगंगा | सिद्धनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड |
धरणांमधील पाणीसाठा -
धरण | पाणीसाठा |
तुळशी | 44.40 दलघमी |
वारणा | 355.92 दलघमी |
दूधगंगा | 244.45 दलघमी |
कासारी | 29.27 दलघमी |
कडवी | 29.03 दलघमी |
कुंभी | 31.44 दलघमी |
पाटगाव | 33.34 दलघमी |
चिकोत्रा | 15.87 दलघमी |
चित्री | 12.92 दलघमी |
जंगमहट्टी | 7.27 दलघमी |
घटप्रभा | 34.04 दलघमी |
जांबरे | 5.64 दलघमी |
कोदे (ल पा) | 2.89 दलघमी |
राजाराम 25.1 फूट, सुर्वे 24.6 फूट, रुई 54 फूट, इचलकरंजी 51 फूट, तेरवाड 46.6 फूट, शिरोळ 35.9 फूट, नृसिंहवाडी 30 फूट, राजापूर 19.6 फूट, तर नजीकच्या सांगली 6.6 फूट व अंकली 10.2 फूट अशी धरणाची पाणीपातळी आहे.