ETV Bharat / state

जालना : अल्पवयीन विवाहितेला फूस लावून पळविले - young married woman was lured away jalna

या प्रकरणात फूस लावून पळवून नेल्याचा आरोप असणाऱ्या तरुणाने या मुलीला यापूर्वी देखील पळवून नेले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, या मुलीचा 14व्या वर्षीच विवाह झाला होता आणि तिला लहान मुलदेखील आहे. त्यावेळी ही माहेरी आली आणि पुन्हा सासरी गेलीच नाही.

kadim jalna police station
कदीम जालना पोलीस ठाणे
author img

By

Published : May 10, 2021, 9:08 PM IST

जालना - एका 17 वर्षाच्या अल्पवयीन विवाहित मुलीला रोहनवाडी येथील एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी रेल्वे स्थानक परिसरातील 39 वर्षीय आव्हाड यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, या विवाहितेने तिच्या मुलाला यापूर्वीच पतीकडे ठेवलेले आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात फूस लावून पळवून नेल्याचा आरोप असणाऱ्या तरुणाने या मुलीला यापूर्वी देखील पळवून नेले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, या मुलीचा 14व्या वर्षीच विवाह झाला होता आणि तिला लहान मुलदेखील आहे. त्यावेळी ही माहेरी आली आणि पुन्हा सासरी गेलीच नाही. त्यामुळे या विवाहितेच्या पतीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पतीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण तिथेच दबले. त्यानंतर या विवाहितेने मुलाला पतीकडे सोडून या तरुणासोबत पलायन केले होते. मात्र, पुन्हा तिला घरी आणण्यात आले.

गेल्या पाच महिन्यांपासून ती आदर्श नगर येथील तिच्या आई-वडिलांकडे राहत होती. 8 मेला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली आणि परत आलीच नाही. त्यामुळे आधी पळवून नेलेल्या तरुणानेच आताही या अल्पवयीन विवाहित मुलीला पळवून नेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

हेही वाचा - सख्ख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, महिलेने केला तीन वर्षीय भाच्याचा खून

दरम्यान, या मुलासोबत पोलिसांनी संपर्क साधला असून मुलाने या अल्पवयीन मुलीला पळविले नसल्याचे सांगितले आहे. तो मुलगा पुणे येथे राहत असून उद्या पोलीस ठाण्यात हजर होणार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोड या करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.