ETV Bharat / state

आरोग्यमंत्र्याच्या गावातील स्त्री रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव... पाहा ईटीव्ही भारतचा 'ग्राऊंड रिपोर्ट' - आरोग्यमंत्र्यांचे गाव

स्त्रियांच्या आजाराशी निगडीत असलेल्या तपासणी यंत्रणेचा अभाव जालन्यातील स्त्री रुग्णालयात आहे. या ठिकाणी महिला रुग्णालयात सोनोग्राफी मशीन देखील नसल्याने गरोदर महिलांची गैरसोय होत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या गावातच महिला रुग्णांची अशी आबाळ होत आहे.

jalna woman hospitals
आरोग्यमंत्र्याच्या गावातच स्त्री रुग्णालय सोनोग्राफी मशीन पासून वंचित...पाहा ईटीव्ही भारतचा 'ग्राऊंड रिपोर्ट'
author img

By

Published : Sep 11, 2020, 1:54 PM IST

जालना - एखाद्या कॉर्पोरेट हॉस्पिटलसमोर सरस ठरेल, अशी जालन्यातील स्त्री रुग्णालयाची शासकीय इमारत आहे. मात्र स्त्रियांच्या आजाराशी निगडीत असलेल्या तपासणी यंत्रणेचा अभाव या ठिकाणी आहे.

आरोग्यमंत्र्याच्या गावातच स्त्री रुग्णालय सोनोग्राफी मशीन पासून वंचित...पाहा ईटीव्ही भारतचा 'ग्राऊंड रिपोर्ट'

या स्त्री रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन नसल्यामुळे विशेष करून गर्भवती महिलांची गैरसोय होत आहे. सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अशा गर्भवती महिलांसाठी धोका वाढला आहे.

सोनोग्राफी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून डॉक्टरांचे पत्र मिळाल्यानंतर संबंधित महिलेची जालना शहरातील काही खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केली जाते; आणि या बदल्यात शासनाकडून रुग्णालयाला एका सोनोग्राफीचे चारशे रुपये दिले जातात. या सर्व प्रकारासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांना चार महिन्यांपूर्वीच माहिती देण्यात आली होती. यानंतर त्यांनी आठ दिवसांत जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन कार्यान्वित होणार असल्याचे आदेश दिले. मात्र, चार महिने उलटूनही ही अद्याप ही मशीन कार्यान्वित झाली नाही. सामान्य रुग्णालय आता याच स्त्री रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयाची पूर्ण इमारत आता कोरोना रुग्णालय म्हणून कार्यान्वित केली आहे.

दोन वर्षांपूर्वी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही इमारत कार्यान्वित झाली. मात्र, रुग्णालयासाठी लागणाऱ्या यंत्रणा येथे अपुर्‍या आहेत. इमारतीच्या वर असलेला स्त्री रुग्णालयाचा बोर्ड खाली पडून कधी कोणाचा बळी घेईल, हे सांगता येत नाही. हीच अवस्था गर्भवती महिलांची आहे. सोनोग्राफी करण्यासाठी जाताना कधी कोणाचा जीव धोक्यात येईल, हे देखील सांगता येणार नाही.

गर्भवती महिलांचा सोबतच महिलांचे पोटाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार अशा अनेक समस्यांसाठी सोनोग्राफी मशीनची आवश्यकता आहे. मात्र ती नसल्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना परिस्थितीमुळे या स्त्री रुग्णालयात वर्षाकाठी होणाऱ्या 6000 प्रसूतींमध्ये हे वाढ झाली आहे. महिन्याकाठी सरासरी पाचशे प्रसूती आत्तापर्यंत झाल्या आहेत. मात्र एप्रिलपासून ही संख्या वाढली आहे.

महिला प्रसूतीची आकडेवारी (कंसातील संख्या = सिझर प्रसुती)

एप्रिल - 516 (58 )
मे - 536 (72 )
जून - 528 (80 )
जुलै - 491 (79)
ऑगस्ट - 611 (81)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.