ETV Bharat / state

टंचाईच्या झळा; ऊन टाळण्यासाठी रात्रीच्यावेळी दुचाकीवरुन आणावे लागते पाणी

लालवाडी गावाला पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या. त्यामुळे नागरिकांनी जालना अंबड रस्त्याच्या बाजूला असलेल्या जलवाहिनीतून नळजोडणी घेऊन गावाची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे.

उन टाळण्यासाठी रात्रीच्यावेळी दुचाकीवरुन आणावे लागतेय पाणी
author img

By

Published : May 2, 2019, 1:57 PM IST

जालना - जिल्ह्यातील बहुतांश भाागामध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पाणी आणण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. लालवाडी व सामनगाव दोन गावच्या नागरिकांनी अधिकृतरित्या नळजोडणी घेऊन त्याचा वापरही चांगला केला आहे. येथे पाणी २४ तास जरी उपलब्ध होत असले तरी दुपारच्या उन्हापासून वाचण्यासाठी येथील नागरिक रात्रीच्यावेळी दुचाकीवरुन पाणी नेतात.

उन टाळण्यासाठी रात्रीच्यावेळी दुचाकीवरुन आणावे लागतेय पाणी

लालवाडी या तीन हजार लोकवस्तीच्या गावाला जानेवारीपासूनच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या. त्यामुळे या गावच्या नागरिकांनी जालना अंबड रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून एक नळजोडणी घेऊन त्यातून गावाची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत पाणी कसे वाहून न्यायचे या प्रश्नावर त्यांनी उपाय काढला आहे. दिवसभर ज्या दुचाकीचा वापर प्रवासासाठी केला जातो याच दुचाकींवर ३५ लिटरचे प्रत्येकी ४ कॅन अडकवले जातात आणि पाणी वाहून नेले जाते. हे कॅन अडकविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने दोन्ही बाजूला लोखंडी गजाचे हुक तयार करण्यात आले आहेत. प्रवासाच्या वेळी हे हुक काढून ठेवले जातात, तर पाणी भरताना ते पुन्हा अडकवले जातात.

Intro:दिवसा प्रवासासाठी आणि रात्रीच्या वेळी पाणी वाहून नेण्यासाठी दुचाकी चे रूपांतर केले जात आहे .जालना अंबड महामार्गावर लालवाडी आणि अंतरवाला पाटीवर हे चित्र 24 तास पाहायला मिळत आहे.

Body:जालना अंबड या रस्त्यावर जायकवाडी जालना पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून एक जोडणी घेतली आहे या दोन गावांसह अन्य विविध ठिकाणी देखील जलवाहिनीतून पाणी घेतले जात आहे .मात्र या दोन गावच्या नागरिकांनी अधिकृत रित्या नळजोडणी घेऊन त्याचा वापरही चांगला केला आहे. लालवाडी या तीन हजार लोकवस्तीच्या गावाला जानेवारीपासूनच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाले आहेत .त्यामुळे या गावच्या नागरिकांनी जालना अंबड रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून एक नळजोडणी घेऊन त्यातून गावाची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे. याठिकाणी चोवीस तास पाणी उपलब्ध असल्यामुळे नागरिक दिवसाचे ऊन टाळून आणि कामाच्या व्यापातून वेळ मिळत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी भरणे पसंत करतात . मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत पाणी कसे वाहून न्यायचे या प्रश्नावर त्यांनी उपाय काढला आहे. दिवसभर ज्या दुचाकीचा वापर प्रवासासाठी केला जातो याच दुचाकींवर 35 लिटर चे प्रत्येकी 4 कॅन अडकवले जातात आणि पाणी वाहून नेले जाते. हे कॅन अडकविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने दोन्ही बाजूला लोखंडी गजाचे हुक तयार करण्यात आले आहेत.प्रवासाच्या वेळी हे काढून ठेवून पाणी भरताना ते पुन्हा अडकवले जातत. यामुळे कमी वेळात भरपूर पाणी होते .आणि दिवसा वापरण्यात येणाऱ्या दुचाकीला रात्री देखील वापरता येते .त्यामुळे बहुतांश घरांमध्ये रात्रीच्या वेळी या दुचाकीचे रूपांतर जलवाहिनी मध्ये हे केल्याचे दिसून येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.