ETV Bharat / state

ब्राह्मण समाजाने मनस्थिती बिघडू देऊ नये - विवेक देशपांडे

वाढत्या स्पर्धेमुळे ब्राह्मण समाजात चिंतेचे वातावरण पसरत असल्याच्या अफवा येत आहेत. मात्र, समाजाने आपली मनस्थिती बिघडू देऊ नये, असे आवाहन विवेक देशपांडे यांनी केले.

author img

By

Published : Jul 15, 2019, 8:58 PM IST

विवेक देशपांडे

जालना - वाढत्या स्पर्धेमुळे ब्राह्मण समाजात चिंतेचे वातावरण पसरत असल्याच्या अफवा येत आहेत. मात्र, समाजाने आपली मनस्थिती बिघडू देऊ नये, असे आवाहन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे संचालक, जनता सहकारी बँकेचे सल्लागार, जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज संस्थेचे पदाधिकारी तथा पंतप्रधान कौशल्य विकास विभागाचे संचालक विवेक देशपांडे यांनी केले. ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या व्यासपीठाच्या अध्यक्षस्थानावरून ते रविवारी सायंकाळी बोलत होते.

विवेक देशपांडे

ब्राह्मण समाजाने नोकरी करण्याची मनस्थिती बदलून उद्योजक निर्माण करण्यासाठी अनेक हातांना रोजगार उपलब्ध करून देण्याची परिस्थिती तयार केली पाहिजे. सध्याचे सरकार हे चांगल्या विचारांना चालना देणारे आहे. त्यामुळे या सरकारचा देखील समाजाने उपयोग करून घेतला पाहिजे. एवढेच नव्हे तर पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना अपेक्षित असलेल्या क्षेत्रांमध्ये वाव दिला पाहिजे. त्यासाठी संकल्प करणे गरजेचे असल्याचेही ही विवेक देशपांडे यांनी सांगितले.

देशपांडे पुढे म्हणाले, आत्तापर्यंत देश घडविण्याचे आणि देशाला समृद्ध करण्यासाठी विचार पुरविण्याचे कामही समाजानेच केले आहे, ते चालू ठेवले पाहिजे. सद्यपरिस्थितीत राज्यामध्ये तरुणांच्या नोकरी संदर्भात चिंतेचे वातावरण दिसत आहे. मात्र, समाजाने हे लक्षात घ्यायला हवे, की अशा परिस्थितीत भाजून निघाल्यानंतरच आपली गुणवत्ता सिद्ध होते. तूर्तास आपण कोमात गेलो आहोत, अशी मानसिकता समाजाची झाली आहे. परंतु, हा गैरसमज समाजाने दूर करून आपण कोण आहोत? हे ध्यानात घ्यायला हवे. त्यावर जर लक्ष केंद्रित केले तर जग पादाक्रांत करणे अवघड नाही.

याच कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार यासोबतच श्री चतुर्वेदेश्वर वेद आश्रम सावरगाव (ता. परतूर) येथील वेदाध्यापक देशीक शास्त्री कस्तुरे आणि जालना शहरातील वेदशास्त्रसंपन्न विनायक महाराज फुलंब्रीकर यांचाही समाज भूषण म्हणून सत्कार करण्यात आला.

Intro:वाढत्या स्पर्धेमुळे ब्राह्मण समाजात चिंतेचे वातावरण पसरत असल्याच्या अफवा येत आहेत. मात्र समाजाने आपली मनस्थिती बिघडू देऊ नये असे ,आवाहन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे संचालक, जनता सहकारी बँकेचे सल्लागार , जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचे पदाधिकारी तथा पंतप्रधान कौशल्य विकास विभागाचे संचालक विवेक देशपांडे यांनी केले. ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या व्यासपीठाच्या अध्यक्षस्थानावरून ते रविवारी सायंकाळी बोलत होते.

Body:ब्राह्मण समाजाने नोकरी करण्याची मनस्थिती बदलून उद्योजक निर्माण करण्याची ,अनेक हातांना रोजगार उपलब्ध करून देण्याची परिस्थिती तयार केली पाहिजे, सध्याचे सरकार हे चांगल्या विचारांना चालना देणारे आहे, त्यामुळे या सरकारचा देखील समाजाने उपयोग करून घेतला पाहिजे ,एवढेच नव्हे तर पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना अपेक्षित असलेल्या क्षेत्रांमध्ये वाव दिला पाहिजे ,त्यासाठी संकल्प करणे गरजेचे असल्याचेही ही विवेक देशपांडे यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता आत्तापर्यंत देश घडविण्याचे आणि देशाला समृद्ध करण्यासाठी विचार पुरविण्याचे काम नाही ही समाजानेच केले आहे,ते चालू ठेवले पाहिजे, सद्यपरिस्थितीत राज्यामध्ये तरुणांच्या नोकरी संदर्भात चिंतेचे वातावरण दिसत आहे. मात्र समाजाने हे लक्षात घ्यायला हवे की अशा परिस्थितीत भाजून निघालेल्या नंतरच आपली गुणवत्ता सिद्ध होते .तूर्तास आपण कोमात गेलो आहोत, अशी मानसिकता समाजाची झाली आहे. परंतु हा गैरसमज समाजाने दूर करून आपण कोण आहोत? हे ध्यानात घ्यायला हवे .त्यावर जर लक्ष केंद्रित केले तर जग पादाक्रांत करणे अवघड नसल्याचेही श्री देशपांडे यांनी सांगितले. याच कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार यासोबतच श्री चतुर्वेदेश्वर वेद आश्रम सावरगाव (तालुका परतुर) येथील वेदा अध्यापक वेदशास्त्रसंपन्न देशिक शास्त्री कस्तुरे आणि जालना शहरातील वेदशास्त्रसंपन्न विनायक महाराज फुलंब्रीकर यांचाही समाज भूषण म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सौ. ज्योती धर्माधिकारी ,पवन जोशी, एड. सुनील किनगावकर, सिद्धिविनायक मुळे ,सचिन देशपांडे, गणेश अग्निहोत्री, संजय पाटील, बंकट खंडेलवाल ,अमित कुलकर्णी, सुरेश मुळे ,यांची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. आर .जोशी यांनी केले ,आणि पाहुण्यांचा परिचय दीपक रणनवरे यांनी करून दिला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.