जालना - राज्यात भाजपचे सरकार आणखी 5 वर्ष हवे होते. मात्र, राज्यात भाजपचे सरकार नाही याची खंत सर्वांना आहे असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. जालन्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या वतीने 'केंद्रीय अर्थसंकल्प-महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमके काय मिळणार' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते. (Railways Raosaheb Danve ) तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामे केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरू असल्याच सांगत दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्हीही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली आहे.
हे तिन्हीही पक्ष दोन-दोन वस्तारे मारतात
तिरुपती बालाजी येथील न्हावी त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकाच्या डोक्यावरील केस एकदाच न काढता सुरुवातीला दोन दोन वस्तारे हाणून त्यांना बसून ठेवतात. तर त्यांच्या डोक्यावर राहिलेले अर्धे केस दिवस वळाल्यानंतर काढतात. आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक खेचण्यासाठी ते असे करत असतात असे सांगत महाविकास आघाडी सरकार मधील तिन्हीही पक्षांची अवस्था तिरुपती मधील न्हाव्यांसारखी झाली असून लोक पक्षांपासून तुटू नये म्हणून हे तिन्हीही पक्ष दोन दोन वस्तारे हाणून विकासकामांना तुटपुंजा निधी देत असल्याचा टोला दानवे यांनी हाणला आहे. पण (2024)नंतर काही करता आले तर बघू असंही ते म्हणाले.
शुभारंभ येत्या 12 मार्च रोजी होणार
जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाच्या कामाच्या निविदा प्रसिद्धा झाल्या आहेत. या रेल्वेमार्गाचे सहा महिन्यात सर्वेक्षण पूर्ण होईल होऊन या रेल्वे मार्गाचे उदघाटन करणार असल्याचेही दानवे म्हणाले आहेत. शिवाय मराठवाड्यातील नांदेड ते मनमाड या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ येत्या 12 मार्च रोजी करणार असल्याच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाचे पुरावे सीबीआयला देणार; राणेंचे वकील मानेशिंदेची माहिती