जालना - तालुक्यातील सायगाव शिवारातील सुखना नदी पात्रात पाणी पुरवठा करणाऱ्या ग्राम पंचायतच्या विहिरीत आडवे बोअर घेत असताना अपघात झाला. या अपघातात एक मजूर ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहे.
जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील सायगाव येथून सुखना नदी वाहते. या नदी पात्रात विविध गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहे. या ठिकाणी लोणार भायगाव या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी वॉटर ग्रीड (पेय जल योजनेतून) विहिर खोदण्यात आली होती. परंतु, दिवसेंदिवस पाणी कमी पडत असल्याने व पाणी टंचाई वाढत असल्यामुळे या विहिरीत आडवे बोअर मारून पाणीटंचाई दूर करण्याच्या हेतूने बोअर घेण्यात येत होते. यात कामावर बोअर घेत असताना बोअर मशीनचा दांडा तुटून खाली पडल्याने काम करत असलेले प्रकाश, रामणारायम, सगरस हे तिघेही विहिरीत कोसळले. त्यापैकी सगरस याचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रामप्रसाद दसपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार बदनापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. तर, अधिक तपास खरात हे करत आहेत.