भोकरदन (जालना) - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भोकरदन शाखेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यामध्ये वृद्ध, महिलांची संख्या मोठी आहे. बँकांबाहेर होणारी गर्दी पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे विविध मागणीचे निवेदन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
या निवेदन लिहिले आहे की, बँकेत येणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवता यावा यासाठी चौकटांची आखणी करावी, त्यांच्यासाठी मंडप उभारावेत जेणेकरून त्यांना सावली मिळेल. त्याचबरोबर शक्य असल्यास जे ग्रामीण भागातून येत आहेत. त्यांसाठी गावातच पैसे कसे देता येईल याबाबत काही उपाययोजना करता येईल का, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी त्रिंबराव पाबळे, प्रकाश जाधव, रफिक कादरी, हर्षल शिरोळे, महेश दसपूते, संजय दळवी आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - लाचेचा पहिला हप्ता घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात