जालना - जालन्यातील श्रीष्टीजवळ कसुरा नदीच्या पुलावर पुराच्या पाण्यात बस घालून स्वतःचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्या प्रकरणी चलका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 23 सप्टेंबर)रोजी परतूर तालुक्यातील श्रीष्टी येथे जालना-आष्टी बस कसुरी नदीवरील पुलावरून घसरल्याची घटना घडली होती. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येथील नागरिकांना यश आले आहे.
आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालन्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी येथे पुलाच्या पाण्यातून बस चालवणे बस चालकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. श्रीष्टी येथील कसुरा नदीच्या पुलावरील पाण्यातून बस चालवत नेल्याने पुराच्या पाण्याच्या वेगाने बस पुलावरच पलटली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते. या प्रकरणी डेपो मॅनेजर यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात निष्कजीपणे रस्त्याचा अंदाज न घेता दुर्लक्ष केल्याप्रकरणी चालकाने स्वतःचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस पुलावरून नेली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागवे अधिक तपास करत आहेत. समोरून दुचाकीस्वार भरधाव वेगाने आल्याने त्याला वाचण्याच्या प्रयत्न केल्याने बस पुलाखाली गेली असे स्पष्टीकरण चालकाने दिले आहे.
बसमध्ये 25 प्रवाशी होते
शुक्रवारी (दि. 23 सप्टेंबर)रोजी परतूर तालुक्यातील श्रीष्टी येथे जालना-आष्टी बस कसुरी नदीवरील पुलावरून घसरल्याची घटना घडली होती. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येथील नागरिकांना यश आले होते. या बसमध्ये 25 प्रवाशी होते, त्यात 2 लहान मुलांचाही समावेश होता. पुलावरील पाण्यातून बस नेल्याने पुराच्या पाण्याच्या वेगाने बस पुलावरून कलंडली होती. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर बस चालक आणि वाहक फरार झाले. दरम्यान, ही बस परतूरहून आष्टीकडे जात असताना ही घटना घडली होती. रात्री 8 वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याने मदतकार्यात अडथळे आले, तरीही स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले होते.
हेही वाचा - जालना : कसुरी नदीवरील पुलावरून बस कलंडली, 2 लहान मुलांसह 25 प्रवाशी सुखरूप