ETV Bharat / state

पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा, हॉटेल व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

author img

By

Published : Dec 18, 2019, 8:41 PM IST

हॉटेल व्यावसायिकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्याच्या आवारातच या व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. संजय रामभाऊ राऊत, असे या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Suicide attempt by hotel businessman
हॉटेल व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

जालना - तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी हॉटेल व्यावसायिकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्याच्या आवारातच या व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. संजय रामभाऊ राऊत, असे या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हॉटेल व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल आदर्श पॅलेस आहे. हे हॉटेल सोनल संजय राऊत यांच्या नावावर आहे. हा सर्व व्यवसाय संजय राऊत व मुलगा करण राऊत यांना मुखत्यारपत्र दिले आहे. या ठिकाणी 5 मे 2015 ला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही पोलीस आले. त्यांनी या हॉटेलमधून 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना या पाण्याच्या बाटल्यांचे पैसे मागितले. त्यामुळे पैसे मागितल्याच्या रागातून पोलिसांनी वाद घातला. हा सर्व प्रकार पोलीस उपविभागीय अधिकारी दीक्षित गेडाम यांच्या उपस्थितीत झाला होता. पोलिसांनी राऊत आणि हॉटेलमधील कामगारांना शिवीगाळ आणि मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यानंतर तीन दिवसांत त्यांची जामीनावर सुटका झाली.

हेही वाचा - स्तुत्य उपक्रम, तेराव्याचे पैसे शाळेच्या पाणी पुरवठ्यावर खर्च

त्यावेळी संजय राऊत यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यापासून ते पोलीस महासंचालक मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांवर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर 5 ऑक्टोबर 2015 ला सुनावणी झाली. त्यावेळी राऊत यांनी जालन्याच्या मुख्य न्यायदंडाधिकरी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली. यावर 10 डिसेंबर 2019 ला निकाल लागला. यावेळी न्यायालयाने दीक्षित गेडाम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चंदनझिरा पोलिस ठाण्याला दिले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे राऊत यांनी मंगळवारी 17 डिसेंबरला पुन्हा एक स्मरणपत्र पोलीस ठाण्याला दिले. तसेच न्यायालयाचा आदेशही स्वतः पोलीस ठाण्यात जमा केला. असे असतानाही आज 18 डिसेंबरलाही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे संजय रामभाऊ राऊत यांनी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या समोरच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण चिगळण्याचे दिसताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठाळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना बोलावून हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; बदनापूर तालुक्यातील वाल्हा येथील घटना

यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांचीही उपस्थिती होती. चर्चेच्या शेवटी गेडाम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागेल आणि ती आहे का? हे तपासून घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया करू, अशी माहिती खीरडकर यांनी दिली.

दरम्यान, न्यायालयाचा आदेश असतानाही पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आता आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती तक्रारदाराचे वकील एच. टी. काकडे यांनी दिली आहे.

Intro:तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा मागणीसाठी बार चालकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलीस ठाण्याच्या आवारातच केला. त्यामुळे या बारचालका सोबत आलेल्या व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी,शहरातील औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल आदर्श पॅलेस आहे.हॉटेल हे सोनल संजय राऊत यांच्या नावावर असून त्यांनी हा सर्व व्यवसाय पाहण्यासाठी संजय राऊत व मुलगा करण राऊत यांना मुखत्यारपत्र दिले आहे त्या. अधिकाराने दिनांक पाच मे 2015 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांसोबत पाण्याचे पैसे मागितल्यावरून वाद झाला होता. पैसे मागितल्याचा राग पोलिसांनी मनात ठेवून जास्तीचा फौजफाटा बोलावून येथील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली होती.हा सर्व प्रकार पोलीस उपविभागीय अधिकारी दीक्षित गेडाम यांच्या उपस्थितीत झाला होता .त्यानंतर पोलिसांनी राऊत आणि हॉटेलमधील कामगारांना शिवीगाळ ,आणि मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते, तीन दिवस शिक्षा भोगल्यानंतर यांची जमानत झाली आणि त्यावेळी यांना लक्षात आले की त्यांना चुकीच्या प्रकरणात गोवले गेले आहे.
त्यामुळे संजय राऊत यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यापासून ते पोलीस महासंचालक मुंबई यांच्याशी पाच वेळा पत्रव्यवहार करून आपली तक्रार नोंदविली ,मात्र आरोपींवर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ फौजदारी याचिका दाखल केली होती या याचिकेची सुनावणी होऊन 5 ऑक्टोबर 2015 ला झाली आणि कायद्यामधील तरतुदीनुसार फिर्यादीला कायद्याची मदत घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. या अधिकाराचा वापर करून संजय राऊत यांनी जालन्याच्या मुख्य न्यायदंडाधिकरी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादी चा निकाल दिनांक 10 डिसेंबर 2019रोजी लागून न्यायालयाने दीक्षित गेडाम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चंदनझिरा पोलिस ठाण्याला दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल न करता पोलिसांनी टाळाटाळ करुन गेडाम यांच्यासह अन्य आरोपींना पाठीशी घालण्याचे काम केले मुळे संजय राऊत यांनी मंगळवार दिनांक 17 रोजी पुन्हा एक स्मरणपत्र पोलिस ठाण्याला दिले .आणि न्यायालयाचे आदेश स्वहस्तेठाण्यात हजर केले .असे असतानाही आज दिनांक18 रोजी देखील गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे फिर्यादी संजय रामभाऊ राऊत यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या समोरच अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर हे फिर्यादी ठाण्याच्या समोरच ठिय्या देऊन बसले होते त्यांना शहरातील व्यापाऱ्यांनाही पाठिंबा दिला होता. प्रकरण चिगळण्याचे दिसताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठाळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांना बोलावून हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांचीही उपस्थिती होती. चर्चेच्या शेवटी गेडाम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागेल आणि ती आहेका? हे तपासून घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया करूअशी माहिती खीरडकर यांनी दिली .
दरम्यान न्यायालयाचा आदेश असतानाही पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे आता आपण उच्च न्यायालयात अपील करू अशी माहिती फिर्यादीचे वकील एच. टी .काकडे यांनी दिली आणि त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, जालना पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विनीत साहनी, अंकुश राऊत ,रमेश तवरवाला,आदींची उपस्थिती होती.Body:सोबत विजवलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.