जालना - जालन्यातील परतूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे याला एक लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. मंठा तालुक्यातील वरुड गावच्या शेतकऱ्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून घेतलेल्या शेडनेटच बिल काढण्यासाठी सोनकांबळे याने पैशांची मागणी केली होती. अखेर एक लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोनकांबळे याला रंगेहाथ पकडले. परतुर तालुक्यातील मांडवा देवी येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या लाचखोरीमुळे कृषी विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी लाचखोर अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जालन्यात एक लाखांची लाच घेताना उपविभागीय कृषी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले - Agriculture officer caught taking bribe
जालन्यातील परतूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे याला एक लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.